आरोग्यासाठी उपयुक्त ठरु शकतो ओवा (Qualities Of ...

आरोग्यासाठी उपयुक्त ठरु शकतो ओवा (Qualities Of Ajwain For Good Health)


ओव्यात प्रोटीन, फॅट, फायबर आणि कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि निकोटिनिक सिड यांसारखे गुणधर्म असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. ओव्याचे सेवन केल्याने सर्दी, फ्लू, नाक वाहणे आणि सर्दीपासून आराम मिळतो.
भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात ओव्याचा वापर आवर्जुन केला जातो. स्वयंपाकघरात ओव्याचा वापर मसाला म्हणून केला जात असला तरी आयुर्वेदात ओव्याचे अनेक औषधी फायदे सांगितले आहेत. पराठा, भजी, पुरी, चिवडा इत्यादींमध्ये याचा वापर होतो. ओव्याचा प्रभाव गरम असतो त्यामुळे थंड हवामानात तो खूप फायदेशीर ठरतो. ओव्यात प्रोटीन, फॅट, फायबर आणि कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि निकोटिनिक सिड यांसारखे गुणधर्म असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत. ओव्याचे सेवन केल्याने सर्दी, फ्लू, नाक वाहणे आणि सर्दीपासून आराम मिळतो. आज आपण ओवा खाण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे काय आहेत हे पाहणार आहोत.
ओव्याचे फायदे आणि खाण्याची योग्य पद्धत

पचनक्रिया सुधारते
ओव्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ओवा खाल्ल्याने पोटात गॅस, पोटदुखी, सर्दी-खोकला यासारख्या समस्यांपासून सुटका होते. यासाठी ओवा, काळं मीठ आणि वाळलेले आले म्हणजेच सूंठ यांची बारीक पावडर म्हणजेच चुरण तयार करा. जेवल्यानंतर या चुरणाचे सेवन करावे.

बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी ओवा खूप उपयुक्त ठरतो. कोमट पाण्यासोबत याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून बराच आराम मिळतो.

सर्दी- खोकल्यापासून आराम मिळतो
ओव्याचा प्रभाव खूप गरम असतो. अशा परिस्थितीत हिवाळ्यात ओवा खाल्ल्यास खोकला, सर्दी आणि कफची समस्या दूर होते. यासाठी पाण्यात ओवा टाकून हे पाणी उकळून घ्या. या पाण्यामध्ये काळे मीठ मिसळून प्यायल्याने आराम मिळतो.

सांधेदुखीची समस्या दूर होते
ओव्यामुळे सांधेदुखीच्या आजारातही आराम मिळतो. ओव्याच्या पावडरची पोटली तयार करुन गुडघ्याला शेक दिल्याने खूप आराम मिळतो. अर्धा कप ओव्याच्या रसामध्ये सूंठ मिक्स करुन हे पाणी प्यायल्याने संधिवात बरा होतो.

मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम
महिलांना मासिक पाळीदरम्यान कंबरेच्या खालच्या भागात आणि पोटात खूप वेदना होतात. अशा परिस्थितीत पाण्यामध्ये ओवा टाकून ते पाणी उकळून घ्या. हे पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला आराम मिळतो.