इडा पिडा टाळणारी पिरॅमिड (Pyramids can protect ...

इडा पिडा टाळणारी पिरॅमिड (Pyramids can protect from Dangers in life)

पुरातन काळापासून पिरॅमिड हा सकारात्मक उर्जेचा स्रोत समजला जातो. यामुळे सकारात्मक उर्जा संतुलित ठेवली जाते आणि मनातील इच्छित पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो.

इजिप्तमध्ये प्रेत सुरक्षित ठेवण्याची प्रथा-परंपरा सर्वात प्राचीन आहे. प्रेत सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या मोठमोठ्या गुहा बांधकाम करून तयार केल्या जात. त्याच ‘पिरॅमिड’ नावानं ओळखल्या जातात.
गणित विषयाचा सखोल अभ्यास, भूमिती, ज्योतिषविद्या, खगोलशास्त्र, पर्यटनशास्त्र, स्थापत्यशास्त्र, वास्तुकलाशास्त्र इत्यादी शास्त्रांचा समन्वय म्हणजे ‘पिरॅमिड’ निर्मिती होय. पिरॅमिड स्वतःच विशिष्ट प्रकारचं चुंबकीय वातावरण उत्पन्न करते. याचाच परिणाम म्हणून काळ-वेळ यांचा प्रभाव अत्यंत क्षीण व मंद मंद होत जातो.

पिंडी ते ब्रह्मांडी
पिरॅमिड हे एका विशिष्ट शक्ती केंद्रावर भूमितीय दृष्ट्या स्थित असल्यामुळे मनुष्य ब्रह्मांडाच्या केंद्र बिंदूस जोडला जातो. पिरॅमिडची संरचना मानवाचा आत्मा ब्रम्हांड शक्तीशी जोडण्यासाठी आहे. श्रेष्ठ, ज्ञानी आणि आध्यात्मिक प्रगती साधलेल्या मानवाने पिरॅमिडची रचना करून महान कार्य केले आहे. जे ब्रह्मांडात तेच मानवाच्या पिंडात आहे. ही गोष्ट पिरॅमिडच्या संरचनेमुळे सिद्ध होते.
फेंगशुईशास्त्रामध्ये पिरॅमिडचा वापर केला जातो. पिरॅमिडच्या चमत्कारिक शक्तीमुळे घरातील समस्या सोडविल्या जातात. म्हणूनच घरातील त्रुटी काढून टाकण्यासाठी, घरातील शुभ-अशुभ ऊर्जेचं संतुलन राखण्यासाठी विविध प्रकारे पिरॅमिड्सचा वापर करून घेता येतो. ‘पिरा’ म्हणजे ‘अग्नी’ आणि ‘मिड’ म्हणजे ‘मध्य’ होय. अशा या पिरॅमिडमध्ये विशिष्ट चुंबकीय ऊर्जा निर्माण होते. यात ठेवलेली कोणतीही गोष्ट, आहे त्याच स्वरूपात वर्षानुवर्षं राहते.

पिरॅमिडचे फायदे
*    पिरॅमिडच्या चुंबकीय शक्तीनं भारलेलं पाणी प्याल्यास सांधेदुखी, अंगदुखी, सूज तसंच शारीरिक अवयवांची जुनी दुखणी निवारली जातात.
*    अल्सर, मधुमेह, अस्थमा, दमा, हृदयविकार, बुद्धिमांद्य, अर्धांगवात इत्यादी अनेक रोगांचंही निवारण पिरॅमिडनं भारलेलं पाणी प्याल्यानं होतं.
*    पिरॅमिड इतकं परिणामकारक असतं की ते आपल्यापासून दोन-तीन फुट अंतरावर ठेवलं तरीही  त्याच्या प्रभावानं मनातील चिंता, हुरहुर, भय, काळजी, गोंधळ दूर होतो.
*    घरात योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे पिरॅमिड ठेवल्यास भांडणं होत नाहीत.
*    मोटार सायकल, कार, ट्रकच्या वर आणि समोरच्या बाजूला दोन पिरॅमिड लावले तर अपघात होत नाहीत. इंधनाचा वापर कमी प्रमाणात होतो.
*    मशीनवर पिरॅमिड लावल्यानं मशीन बंद पडत नाही.
*    तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या पेटीत किंवा कपाटात दक्षिणोत्तर पिरॅमिड ठेवल्याने पैशांची आवक वाढते व पैसा स्थिर राहतो.
*    पलंगाखाली 12 इंचाचे 9 पिरॅमिड्स ठेवले तर शांत झोप लागते. शरीरात ऊर्जा आणि स्फूर्ती वाढते.
*    ऑपरेशनची आवश्यकता असलेले रोग सुद्धा पिरॅमिडच्या योग्य वापरामुळे संपूर्ण बरे होतात. अगदी 10-12 वर्षं जुनाट रोगही बरे होतात.

दिशेप्रमाणे पिरॅमिडचा उपयोग
उत्तर दिशा
उत्तर दिशेचा कारक काळा रंग भौतिक सुखप्राप्तीसाठी तुमच्या पिरॅमिडला लावा. उत्तरेस असलेल्या पिरॅमिडच्या बाजूला काळ्या रंगाचा चौकोनी कागद चिकटवा. आणि आपल्या आवश्यकता तसेच गरजांवर पूर्ण शक्तीनिशी मन केंद्रित करा. यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. सोनेरी खडू किंवा पेंटही यासाठी फारच प्रभावी ठरतो.

पूर्व दिशा
पिरॅमिडची पूर्व बाजू विश्‍वाशी नातं जोडून, कार्यक्षमता व योग्यता वाढवते. लोकांच्या मनात तुमच्याविषयी प्रेम आणि आदर वाढवते. पूर्व दिशेकडील पिरॅमिडवर निसर्गचित्र रंगवा किंवा निसर्गचित्र लावा.त्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. त्यामुळे मानसिक शांतता लाभते.

दक्षिण दिशा
दक्षिण दिशेच्या पिरॅमिडला निळा रंग वापरावा. या दिशेच्या पिरॅमिडच्या बाजूनं काम करत असताना ऊर्जेचं संरक्षण प्राप्त करत असल्याची अनुभूती होईल.

पश्‍चिम दिशा
पश्‍चिम दिशेचा संबंध आरोग्य व शक्ती यांच्याशी आहे. यासाठी लाल रंग वापरणं आवश्यक आहे. या पिरॅमिडमुळे एकूण कार्यशक्तीत वाढ होते.

सूर्यप्रकाशात सात रंगांचं संयोजन आहे. या सप्त रंगांच्या वर्गीकरणानुसार पिरॅमिडच्या रंगांचा वापर करावा.
लाल रंग
या रंगाची प्रकृती उष्ण आहे. हा अग्नितत्वाचा वाहक आहे. सर्दी, कफ, लकवा, पांढरे कोड, क्षय इत्यादी रोगांचं उच्चाटन करण्यात या रंगाची मदत होते.

नारिंगी रंग
हा रंग उष्ण, विस्तारक व क्रियावर्धक आहे. यकृत, किडनी, वात,आतड्यांच्या व्याधी, जुनाट दमा अशा रोगांत हा रंग उपयुक्त ठरतो. मानसिक बळ व इच्छा शक्तीत वाढ करतो.

पिवळा रंग
हा रंग उष्ण प्रकृतीचा आहे. अग्नी तत्त्वाच्या रोगांमध्ये या रंगाचा चांगला उपयोग होतो. मंदाग्नी, अजीर्ण, वातविकार सारख्या रोगातून मुक्ती देण्यात हा रंग उपयोगी ठरतो.

हिरवा रंग
हा निसर्गाचा रंग आहे. हा रंग शरीर व मनाला शांती प्रदान करतो. हृदय व रक्तविकार, कॅन्सर, नेत्ररोग व त्वचा रोगाच्या उपचारावर चांगला परिणाम करतो.

आकाशी रंग
हा रंग थंड व सुखदायक आहे. किटाणुनाशक हा याचा विशेष गुण आहे. मुख, गळा व डोळ्यावरील भाग इत्यादी अवयवांसाठी हा विशेष उपयोगी आहे. हा रंग आध्यात्मिक विकास व ध्यानधारणेत मदत करतो.

निळा रंग
हा रंग विशेषतः दमा व क्षय सारख्या रोगांत लवकर आराम देतो. डोळे, कान, नाक, पक्षाघात, लकवा, वेडसरपणा सारख्या आजारपणावर उपचार करण्यासाठी हा रंग उपयोगी पडतो.

जांभळा रंग
हा रंग अग्नी व आकाश यांचं संमीलन असल्याने गाठ, केस गळणे, नेत्रविकार यांसारख्या आजारांसाठी लाभदायी ठरतो.