‘समायरा’ चित्रपटाच्या प्रसारासाठी न...

‘समायरा’ चित्रपटाच्या प्रसारासाठी नायिका केतकी नारायण सोबत पुणेकर महिला बाईक रॅलीत सामील (Pune Women Join In Grand Bike Rally With Actress Ketki Narayan For Marathi Film ‘Samaira’)

ऋषी कृष्ण देशपांडे दिग्दर्शित ‘समायरा’ २६ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘समायरा’च्या प्रवासाची ही कहाणी सर्वांपर्यंत पोहचावी म्हणून चित्रपटाचे जोरदार प्रोमोशन चालू आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात बाईक रॅली काढण्यात आली. केतकी नारायण तिच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अव्हेंजर बाईक चालवताना दिसते आहे. स्वतंत्र, सकारात्मक दृष्टिकोन असलेली ‘समायरा’ स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघाली आहे. तिच्या प्रवासाची ही कथा आहे. नुकतीच केतकीने पुण्यात सर्व महिलांबरोबर बाईक चालवली. ह्या बाईक रॅलीत पुण्यातील बऱ्याच महिलांचा सहभाग होता.

याबद्दल केतकी नारायण म्हणते, ” ‘समायरा’ ही एक सोलो ट्रिपवर असलेल्या मुलीची कथा आहे. सगळ्याच महिला आपापल्या आयुष्यात फायटर असतात. सर्व जबाबदाऱ्या त्या अगदी चोखपणे पार पडतात व आपल्यासोबत आपल्या परिवाराला ही पुढे घेऊन जातात. आजच्या या बाईक रॅलीत मी या सर्व स्ट्राँग महिलांबरोबर माझे ‘समायरा’ हे निर्भीड पात्र प्रेक्षकांच्या समोर आणले. माझ्यासोबतच पुण्यातील महिलांनीही या बाईक रॅलीचा आनंद लुटला.”

ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, आद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, ‘समायरा’ची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पानट, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली आहे. तसेच या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत.