निर्माती संगीता अहिर यांनी गवळी कुटुंबासोबत ...

निर्माती संगीता अहिर यांनी गवळी कुटुंबासोबत ‘दगडी चाळ २’ थिएटरात पाहिला (Producer Sangita Ahir Watched ‘Dagdi Chawl 2’ Alongwith Entire Gawli Family)

राजकारण असो किंवा गॅंगवॉर अरुण गवळी हे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. ‘दगडीचाळ २’ हा चित्रपट मोठ्या दिमाखात अख्ख्या महाराष्ट्रातील  चित्रपटगृहात झळकत असून या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष बाब म्हणजे संगीता अहिर यांनी संपूर्ण गवळी कुटुंबियांसोबत  चित्रपटगृहात जाऊन ‘दगडीचाळ २’ हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर आशाताई गवळी ह्या भावूक झाल्या होत्या. चित्रपटाचे खूप कौतुकही त्यांनी केले. तिकिट कॉउंटरवर या चित्रपटाची  हाऊसफुल पाटी लागलेली पाहायला मिळत असून प्रेक्षक ऍडव्हान्स बुकिंग करत आहेत.

या चित्रपटाबद्दल संगीता अहिर सांगतात, “अरुण गुलाबराव गवळी या वजनदार व्यक्तिमत्वावर सिनेमा करण्याची कल्पना डोक्यात येते आणि तीच कल्पना तितक्याच ताकदीच्या कलाकारांसोबत  पडद्यावर  उतरवणं मोठं आव्हान होतं पण ते आव्हान हसत हसत स्वीकारून ‘दगडीचाळ २’ हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी आणला. लोकांचे हे भरभरून मिळालेलं प्रेम पाहून मला खरंच खूप बळ मिळालं आहे. हा चित्रपट गवळी कुटुंबियांसोबत मला पाहायला मिळाला याचा मला आनंद आहे.

‘दगडीचाळ २’ चित्रपटाच्या संपूर्ण प्रवासात आशाताई गवळी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांचा खारीचा वाटा आहे. या चित्रपटाला सुपरहिट करणाऱ्या माझ्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद.”