प्रियंका चोप्राने वयाची चाळिशी गाठली: बघा तिच्य...

प्रियंका चोप्राने वयाची चाळिशी गाठली: बघा तिच्या वाढदिवसाचे अत्यंत खासगी फोटो (Priyanka Shared Unseen Pictures Of Her Birthday Celebration, Wrote A Love Note For Husband Nick)

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा ४० वर्षांची झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिचा ४० वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहेत. प्रियंकाचा पती निक जोनासने आपल्या पत्नीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन जंगी करण्याची कोणतीच संधी सोडलेली नसल्याचे या फोटोंवरुन दिसून येते.

निकने या सेलिब्रेशनमधील काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. त्यातील एका फोटोत निक आणि प्रियंका एकमेकांच्या ओठांचे चुंबन घेताना पाहायला मिळतात. आता प्रियंकानेसुद्धा तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोत ती तिच्या कुटुंब आणि मित्र परिवारासोबत मस्ती करताना दिसते.

प्रियंकाने या वर्षी मॅक्सिको येथे वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी परिणिती चोप्रा आणि प्रियंकाची आई मधु चोप्रासुद्धा गेल्या होत्या.

फोटोंमध्ये प्रियंका आणि निकची जोडी खूप सुंदर दिसत असली तरी सर्वांची नजर खिळली ती त्यांच्या लेकीवर म्हणजे मालतीवर. एका फोटोत प्रियंकाने मालतीला तिच्या कडेवर घेतले आहे तर तिच्या शेजारी निक हातात केक धरून फोटोसाठी पोज देत आहे. प्रियंका आणि निकची मुलगी ६ महिन्यांची झाली आहे. पण या फोटोतही प्रियंकाने मालतीचा चेहरा लपवला आहे.

याशिवाय प्रियांकाने मस्ती करतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. काही फोटोत  ती डिनर टेबलवर तर काहींमध्ये ती पूलच्या बाजूला पोज देताना दिसत आहे. हे फोटो पोस्ट होताच लगेच व्हायरल झाले आहेत.

या सर्व फोटोंमध्ये नेटकऱ्यांना सर्वात जास्त फोटो आवडला तो म्हणजे ज्याच निक त्याच्या सासूसोबत डान्स करत आहे तो फोटो. हा फोटो पाहून अनेकजण निकचे कौतुक करत आहेत.

प्रियंकाने तिच्या वाढदिवसाचे फोटो शेअर करत तिच्या सर्व मित्रांचे , चाहत्यांचे, तिच्या कुटुंबाचे आणि विशेष म्हणजे निक जोनासचे आभार मानले आहेत. तिने लिहिले की, एवढे प्रेम आणि आपल्या लोकांसोबत घालवलेल्या या सुंदर क्षणांसाठी खूप आभारी आहे.

निक, माझा दिवस एवढा शानदार बनवण्यासाठी माझ्याकडे तुझ्याकडे आभार मानायला शब्द नाहीत. प्रेम कसे करावे हे तुला खरंच माहित आहे. मी खूप भाग्यवान आहे. खूप सारे सरप्राइजेस्, कॉल, मेसेजने माझा दिवस आणखी छान बनवला. इथूनच पुढील आयुष्याची सुरुवात होईल.