नवऱ्याच्या कार्यक्रमात प्रियंका चोप्राचा दिसला ...

नवऱ्याच्या कार्यक्रमात प्रियंका चोप्राचा दिसला रेड हॉट लूक (Priyanka Chopra’s Red Hot Glamorous Look At The Launch Of Nick Jona’s Spaceman Album)

प्रियंका चोप्राच्या नवऱ्याचा निक जोनसचा ‘स्पेसमॅन’ हा अल्बम विशेष चर्चेत आहे. त्याच्या अनावरण प्रसंगी प्रियंकाने एकदम कडक वाटेल असा गडद लाल रंगाचा मॉडर्न ड्रेस घालून असे रेड हॉट लूक सादर केले की तेथील वातावरण गरम झाले. शिवाय तिनं ऑस्कर पारितोषिक वितरण कार्यक्रमासंबंधी पण भाष्य केले…

अमेरिकन गायक असलेला, प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनस याचा ‘स्पेसमॅन’ हा तिसरा अल्बम प्रकाशित झाला. त्यात त्याची ११ गाणी आहेत. या अल्बमच्या अनावरण प्रसंगी प्रियंका एकदम बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमध्ये दाखल झाली. तिनं लालभडक रंगाचा अत्यंत सेक्सी व ग्लॅमरस ड्रेस घातला होता. तिचा हा ग्लॅमरस अवतार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

‘स्पेसमॅन’ अल्बमचे फोटो व व्हिडिओ प्रियंकाने शेअर केले.

निक जोनसला शुभेच्छा देत प्रियंकाने हे फोटो व व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
ऑस्कर नामांकनांबद्दल प्रियंका म्हणते…
यंदाच्या ऑस्कर पारितोषिक वितरण समारोहात स्टार व सेलिब्रिटी कपल म्हणून प्रियंका व निक नामांकने जाहीर करतील. प्रियंकाने ही माहिती इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून दिली आहे. ग्लोबल लाईव्ह स्क्रिनिंग द्वारे नामांकने जाहीर केली जातात. या व्हिडिओमध्ये प्रियंका आकेडमीला मिस्कीलपणे विचारते, ” आकेडमी, मी एकटीच या नामांकनांची घोषणा करते आहे, अशी संधी पुढे मला मिळेल का? मी हे गंमतीने बोलते आहे. लव्ह यू निक जोनस. १५ मार्चला सकाळी ५:१९ वाजता पीडीटी वर नामांकने जाहीर करण्यास आम्ही दोघे खूप उत्साहित आहोत.”

Photo Courtesy: Instagram, Twitter

कंगनाचे भयंकर वादग्रस्त ट्वीट : म्हणते – टॉयलेट स्वच्छ केले नाही तर गांधीजी आपल्या पत्नीला घराबाहेर काढत