प्रियांका चोप्राने केला बॉलिवूड अभिनेत्यांबाबत ...

प्रियांका चोप्राने केला बॉलिवूड अभिनेत्यांबाबत खळबळजनक खुलासा (Priyanka Chopra’s Disclosure About Male Actors In Bollywood, Said – They Decide Everything)

देसी गर्ल प्रियांका चोप्राची भारतातच नाही तर जगभरात खास ओळख आहे. प्रियांकाला महत्वाच्या मुद्द्यांवर अत्यंत प्रांजळपणे मत व्यक्त करताना अनेकदा आपण पाहतो. यंदा ती तब्बल ३ वर्षांनी आपल्या मायदेशी म्हणजेच भारतात आली आहे. भारतात येऊन तिने बॉलिवूडमधील पुरुष कलाकारांच्या वर्चस्वावर खुलेपणाने भाष्य केले. प्रियंकाच्या मते, गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत फक्त पुरुष कलाकारांची चलती आहे. चित्रपट कधी आणि कसा शूट करायचा हे तेच ठरवतात.प्रियांकाने बॉलिवूड इंडस्ट्रीतील पुरुष कलाकारांच्या वर्चस्वाबद्दल उघडपणे आपले मत मांडले आहे. एका मुलाखतीदरम्यान देसी गर्ल म्हणाली, ‘मी हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठी वाटचाल केली आहे, इथे पुरुषांच्या तुलनेत आम्हाला नेहमीच कमी लेखले गेले. बॉलिवूडमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण कुठे करायचे तसेच कोणाला कास्ट करायचं, आणखी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नायक ठरवतात. आता हे सर्व कंटाळवाणे झाले आहे. आता आपण अशा काळात जगत आहोत जिथे महिलांना आपल्या मनातील गोष्ट सांगता येणे आवश्यक आहे.प्रियांका चोप्रा म्हणाली की, फरहान अख्तरच्या आधी मी माझ्या मैत्रिणी आलिया आणि कतरीनाला फोन केला होता. तेव्हा महिलांवर आधारित चित्रपट असावा अशी इच्छा आमच्या मनात आली. म्हणून मग आम्ही मिळून ‘जी ले जरा’ चित्रपट बनवायचे ठरवले. पुढील वर्षी या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात तीन मैत्रिणींची कथा असेल.गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीमुळे चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊ शकले नाही. यानंतर, प्रियांका चोप्रा, कतरीना कैफ आणि आलिया भट्ट या चित्रपटाच्या तीन प्रमुख अभिनेत्री आपल्या वैयक्तिक जीवनात आणि इतर प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाल्या. मात्र, आता या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.