प्रियंका चोप्राला उरोज वाढविण्याचे व कपडे उतरवि...

प्रियंका चोप्राला उरोज वाढविण्याचे व कपडे उतरविण्याचे सल्ले दिले होते… कुणी दिले? का दिले? हिंदी पुस्तकात तिनेच केले खुलासे… (Priyanka Chopra’s Book Now in Hindi, has Shocking Revelations)

प्रियंका चोप्रा लिखित ‘अनफिनिश्ड’ हे इंग्रजी पुस्तक चांगलेच चर्चेत आहे. याची लोकप्रियता व लोकांनी केलेल्या मागणीनुसार तिच्या या पुस्तकाचे हिंदीत भाषांतर प्रसिद्ध झाले आहे. ‘अभी बाकी है सफर’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे.

या पुस्तकातून प्रियंकाने बिनधास्तपणे आपल्या खासगी आयुष्यातले व प्रोफेशनल आयुष्यातले मानापमानाचे प्रसंग वर्णन केले आहेत. त्यातील काही धक्कादायक प्रसंग असे आहेत.
तिला करिअरच्या सुरुवातीला असे एक दिग्दर्शक भेटले, ज्यांनी तिला तिच्या रुपाबद्दल टीका करून प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. प्रियंका लिहिते, ”त्या दिग्दर्शकाला भेटले तेव्हा त्यांनी उभे राहायला सांगून फेऱ्या मारायला सांगितल्या. मी तसे केले. मग बराच वेळ तो मला निरखून पाहत होता. नंतर म्हणाला की, ”अभिनेत्री व्हायचं असेल तर तुला उरोभागाची सर्जरी केली पाहिजे. त्याचप्रमाणे माझी जॉ लाईन आणि नितंब यांचा आकार बदलला पाहिजे,” असा सल्ला दिला. या सल्ल्यानंतर आपण खूपच बेचैन झालो होतो, अन्‌ स्वतःच्या शरीराच्या ठेवणीबद्दल न्यूनगंड निर्माण झाला होता, असंही प्रियंका लिहिते. दुसऱ्या एका दिग्दर्शकाने तिला खडसावले की, ‘चड्डीयां तो दिखनीही चाहिए. नाहीतर प्रेक्षक पिक्चर बघायला कसे येतील?’

प्रियंकाने या पुस्तकात दुसऱ्या एका दिग्दर्शकाने दिलेल्या अजब सल्ल्याचा उल्लेख केला आहे. ती त्याच्या दिग्दर्शनाखाली एका गाण्याचं चित्रण करत होती. ते अतिशय उन्मादक गाणं होतं. त्यामध्ये एकेक करून तिला कपडे उतरवायचे होते. त्याचं शुटिंग करताना अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून प्रियंका एक्स्ट्रा बॉडी लेयर घालणार होती. जेणेकरून तिची त्वचा उघडी पडणार नाही. ”पण ही बाब मी दिग्दर्शकाच्या कानावर घातली, तर तो म्हणाला, तू काहीही कर, पण चड्डीयां तो दिखनी ही चाहिए. नाहीतर प्रेक्षक पिक्चर बघायला कसे येतील?” – मला या प्रवृत्तीचं इतकं वाईट वाटलं की, हा चित्रपट सोडून देण्याचा विचार केला, पण माझ्या सहकारी स्टारने – सलमानने दिग्दर्शकाशी बोलणी केली. मग तो दिग्दर्शक माझ्या अटींवर शुटिंग करायला तयार झाला. पण माझ्यासाठी हा अतिशय विचित्र अनुभव होता… प्रियंका लिहिते.
तिच्या पुस्तकातील आणखी काही धक्कादायक किस्से लवकरच वाचा!