रेड कार्पेटवर प्रियांका चोप्राचे पती निक जोनस स...

रेड कार्पेटवर प्रियांका चोप्राचे पती निक जोनस सोबत बोल्ड लूक… (Priyanka Chopra’s Bold Blazer Stuns At BAFTA Red Carpet With Husband Nick Jones; See Pics)

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

बॉलीवूडनंतर आता हॉलीवुडमध्येही आपलं अभिनयकौशल्य दाखविलेली प्रियांका चोप्रा नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते. आपलं काम आणि खाजगी आयुष्याबाबतच्या अनेक गोष्टी ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. आताही तिने जे फोटो शेअर केले आहेत ते खास आहेत.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

खरं म्हणजे १० आणि ११ एप्रिलला या ७४ व्या ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म एंड टेलीविज़न आर्ट्स अर्थात बाफ्टा ॲवॉर्डच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा भलताच बोल्ड लूक पाहायला मिळाला. या बोल्ड लूकची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगतेय.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

सदर बाफ्टा ॲवॉर्ड सोहळा फेब्रुवारीमध्ये होणार होता परंतु करोनाच्या संसर्गामुळे तो आता एप्रिलमध्ये आयोजित केला गेला. या सोहळ्यात प्रियांका प्रेझेंटर म्हणून सहभागी झाली होती. पती निक जोनससोबत प्रियांकाने रेड कार्पेटवर एण्ट्री करत यावेळी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

फोटो सौजन्य :इंस्टाग्राम

या सोहळ्यातील प्रियंकाच्या दोन वेगवेगळ्या आउटफिटने कमाल केली. केशरचनेपासून ते मेकअपपर्यंत प्रियंकाचा लूक लक्षणीय होता. आणि आपल्या या लूकचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंना अवघ्या काही तासातं लाखों लाईकस् मिळाले आहेत.  

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम