प्रियंका चोप्राची गुडन्यूज! ती झाली सरोगेट माता...

प्रियंका चोप्राची गुडन्यूज! ती झाली सरोगेट माता! (Priyanka Chopra Welcomes A Baby Via Surrogacy : Shares Good News With Fans)

अमेरिका स्थित प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी आपल्या चाहत्यांना खुश खबर दिली आहे. प्रियंका चोप्रा माता बनली आहे, पण सरोगसी पद्धतीने – अर्थात अज्ञात स्त्रीचे गर्भाशय भाडयाने घेऊन तिने मुलाला जन्म दिला आहे. प्रियंका व निक यांनी पोस्ट शेअर करून आपण सरोगसी आईबाप झाल्याची खबर दिली असून सर्वांनी प्रायव्हसी राखा, असे निवेदन केले आहे.

शुक्रवारी रात्री इन्स्टाग्राम वर पोस्ट करून प्रियंकाने ही गुड न्यूज दिली आहे. ती लिहिते – सरोगसी पद्धतीने आम्ही आमच्या बेबीचे स्वागत केले आहे. हे जाहीर करताना खूप आनंद होतो आहे. मात्र कृपया प्रायव्हसी राखा, जेणे करून आम्हाला आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करता येईल. अनेक धन्यवाद!

ही बातमी पसरताच, या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांबरोबरच लारा दत्ता, हुमा कुरेशी, पूजा हेगडे इत्यादी अनेक मान्यवरांनी या दांपत्याचे अभिनंदन केले आहे.
आपल्याला झालेला मुलगा आहे की, मुलगी याचा खुलासा प्रियंकाने केलेला नाही. मात्र एका अमेरिकन वेबसाईटने स्पष्ट केलं आहे की, त्यांना मुलगी झाली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या हॉस्पिटलात तिचा जन्म झाला आहे. नजीकच्या एका बेटावर समुद्रसफर करतानाचा प्रियंका -निकचा फोटो प्रकाशित करून वेबसाईटने म्हटले आहे की, मुलीचा जन्म जवळ आलाय हे कळल्याने हे दोघे जवळ पोहचले होते.

तू आई कधी होणार? असे प्रश्न प्रियंकाला वारंवार विचारले जात होते. तेव्हा ती मोघम उत्तरे देत होती. पु ती वेळ एवढया लवकर येईल, असे कोणाला वाटले नव्हते.