प्रियंका चोप्रा १४व्या वर्षीच प्रेमात पडली होती...

प्रियंका चोप्रा १४व्या वर्षीच प्रेमात पडली होती…(Priyanka Chopra Was In Love At The Tender Age)

प्रियंका चोप्रा अगदी कोवळ्या वयात एका मुलाच्या प्रेमात पडली होती. आणि तिचा प्रेमभंग देखील झाला होता. हा खुलासा तिने स्वतःच केलेला आहे. तिनं लिहिलेल्या अनफिनिश्ड या पुस्तकाचे हिंदी संस्करण प्रसिद्ध झालेले आहे. त्यात तिने आपल्या या कोवळ्या प्रेमाची कबुली दिलेली आहे.

प्रियंकाच्या कोवळ्या प्रेमाची सत्यकथा अशी आहे की, ती १३ वर्षांची असताना शिक्षणासाठी अमेरिकेला गेली होती. तिथे ती किरण मावशीकडे राहात होती. तिकडे ती शाळेत गेली तेव्हा नववीत होती. तिच्याच शाळेत १०वीला असलेल्या बॉब नावाच्या मुलाशी ती डेट करायला लागली. एके दिवशी मावशी घरात नाही, ही संधी साधून तिनं बॉबला घरी बोलावलं. एकांताचा फायदा उठवून प्रियंका-बॉब एकमेकांचे चुंबन घेण्यासाठी जवळ आले. अन्‌ तेवढ्यात मावशी अचानक टपकली. दोघे खूप घाबरले. प्रियंकाने बॉबला कपाटात लपवले. पण ही चोरी पकडली गेलीच. अन्‌ प्रियंकाचे हे प्रेमप्रकरण मावशीने तिच्या आईच्या कानावर घातले… पुढे हा बॉब तिच्याच एका मैत्रिणीशी डेट करू लागला… त्यामुळे प्रियंकाला दुःख झाले… तिचा प्रेमभंग झाला…


चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा जलवा