आपल्याच हॉटेलात अंगप्रदर्शक पांढरा ड्रेस घालून ...

आपल्याच हॉटेलात अंगप्रदर्शक पांढरा ड्रेस घालून प्रियंका चोप्राने केला कहर (Priyanka Chopra Visits Her Restaurant Sona In NYC, Shares Glamorous Pics In White Dress)

प्रियंका चोप्रा आजकाल परदेशातच जास्त राहते. तिनं न्यूयॉर्कमध्ये ‘सोना’ नावाचं एक हॉटेल काढलं आहे. त्याचा कारभार सांभाळते. अन्‌ त्या हॉटेलास लोकाभिमुख करण्यासाठी इंटरनेटवर त्याची छायाचित्रे प्रकाशित करते. आत्ता तर या हॉटेलात काढलेली स्वतःची ग्लॅमरस छायाचित्रे प्रकाशित करून प्रसिद्धीचे नवे तंत्र अंगिकारले आहे.

भारतीय खाद्यपदार्थ देणाऱ्या ‘सोना’ या आपल्या हॉटेलात प्रियंका चोप्रा काही दिवसांपूर्वी, काही मित्रांसह पोहचली होती. ते फोटो इंटरनेटवर तिनं प्रसिद्ध करताच, लोकांनी तिचं अभिनंदन केलं होतं.

आता पुन्हा एकवार ती ‘सोना’मध्ये गेली, पण तिथे जे फोटो काढलेत, ते नजर खिळवून ठेवणारे आहेत. अगदी बोल्ड अवतारात हे फोटो काढून प्रियंकाने कहर केला आहे.

या फोटोंमध्ये प्रियंकाने कमी रुंदीच्या स्ट्रॅप्स, हाय स्लीट व्हाइट सिल्क ड्रेस घातलेला दिसत आहे. या अंगप्रदर्शक ड्रेसला शोभतील अशी गोल्डन हिल्स, गोल्डन रिस्ट वॉच आणि मॅचिंग ब्रेसलेट अशी आभूषणे घातली आहेत. आणि केसांना हाय बन लूक दिला आहे. या सर्व वेशभूषेत प्रियंका फारच सुंदर दिसते आहे.

एका फोटोत प्रियंकाने हातात कॉकटेलचा ग्लास घेऊन प्रसन्नपणे हसते आहे. लाल लिपस्टिक तिला शोभून दिसते आहे.

दुसऱ्या एका फोटोत प्रियंकाने आपल्या हॉटेलचे मेनू कार्ड प्रदर्शित केले आहे.

या सर्व फोटोंमध्ये प्रियंका खूपच हॉट दिसते आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचा मित्रपरिवार आणि चाहत्यांनी या फोटोंना खूपच पसंती दिली आहे. तिचा नवरा निक जोनासने आपले प्रेम व्यक्त करत स्माईलीवाला… इमोजी पोस्ट केला आहे.

न्यूयॉर्कमध्ये २० व्या रस्त्यावर प्रियंकाचे हे रेस्टॉरंट आहे. त्यामध्ये भारतीय खाद्यपदार्थ मिळतात, जे अमेरिकन लोकांना आवडत आहेत. रेस्टॉरंटची सजावट दिमाखदार आहे. प्रियंकाने अतिशय आवडीने या रेस्टॉरंटला मस्त लूक दिलं आहे.