पती निक जोनाससाठी प्रियंका बनली चीअरलीडर, लास व...

पती निक जोनाससाठी प्रियंका बनली चीअरलीडर, लास वेगासमध्ये दिले गोड सरप्राइज(Priyanka Chopra Turns Cheerleader For Hubby Nick Jonas, Gives Him The Sweetest Surprise In Vegas)

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडाचा पती गायक निक जोनासने त्याच्या इंन्स्टाग्राम स्टोरीवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओत दिसते की, त्याची पत्नी प्रियंकाने त्याला एक गोड सरप्राइज दिलं.


प्रियंका चोपडा आणि निक जोनास त्यांच्या फॅन्सना खूश करण्याची एक संधी सोडत नाही. त्यासाठी ते वेगवेगळे फोटो व्हिडिओ शेअर करत असतात. प्रियंकाचा पती निक जोनास त्याच्या म्यूझिक कॉन्सर्टसाठी वेगासला गेला. त्यावेळी त्याची पत्नी प्रियंका चोपडाने त्याला चीअर करण्यासाठी एक गोड सरप्राइज दिले.


या गोड सरप्राइजच्या व्हिडिओची झलक निक जोनासने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दाखवली. या सरप्राइज व्हिडीओ मध्ये हॉटेलची रुम सुंदर डेकोरेट केलेली दिसत आहे. टेबलवर व्हाइट, गोल्डन आणि ब्राउन कलरचे डेकोरेटेड फुगे ठेवले आहे. टेबलवर फुग्यांसोबत एक शॅम्पेनची बॉटल ठेवली होती. टेबल शेजारीच एक पांढऱ्या रंगाचा बोर्ड ठेवलेला आहे ज्यावर प्रियंकाने तिच्या पतीसाठी एक मेसेज लिहिलेला आहे.


प्रियंकाने लिहिलेले, “वेगास रेसिडेंसी बेबी क्रश इट! काश मी तिथे असते. लव्ह, प्री! या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला निकचा आवाज येतो, ज्यात तो बोलतो की, खुप पावरफुल, खूपच सुंदर! थॅंक्स बेब!
निकने तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केल्यावर लगेच प्रियंकाने तो रिशेअर केला. या व्हिडीओत प्रियंका तिच्या पतीसाठी चीअर लीडर बनली आहे. तिने सांगितले की ती निकची खूप मोठी चाहती आहे. व्हि़डिओच्या वर प्रियंकाने एक गोड मेसेज लिहिला, ”तुझी सगळ्याच मोठी चाहती, आय लव्ह यू ! क्रश इट @nickjonas जे आज वेगासला होणार आहे. ३ जून ते ११ जून पर्यंत पार्क एमजीएम लास वेगासला डॉल्बी लाइव मध्ये ‘जोनास ब्रदर्स: लिव इन वेगास’ रेसिडेंसीचे ५ शो आहेत. निक त्याच शो साठी वेगासला गेला आहे.