करीना ते प्रियंका चोप्रापर्यंत… प्रत्येकीची आपल...

करीना ते प्रियंका चोप्रापर्यंत… प्रत्येकीची आपल्या मुलांना झोपवण्याची आहे हटके स्टाइल… (Priyanka chopra to Kareena Kapoor all Bollywood Sexy Mom behaviour with their kids jamie lever mimic video viral)

बॉलीवूडची प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेत्री असलेली जॅमी लिव्हर म्हणजे अभिनेता जॉनी लिव्हर यांच्या लेकीला स्टार किड अन्‌ हुशारी दोन्ही असूनही अपेक्षित यश अजूनही मिळालेलं नाही. परंतु म्हणून निराश न होता जॅमी सतत काही ना काही करत असते. लवकरच जॅमी ‘पॉप कौन’ या विनोदी सिरीजमध्ये दिसणार आहे. जॅमी इन्स्टाग्रामवर सक्रीय असून तेथे ती चाहत्यांच्या मनोरंजनासाठी काही विनोदी व्हिडिओ पोस्ट करत असते. मागे काही दिवसांपूर्वी जेमी लीव्हरचा ‘सेलेब्स त्यांच्या मुलांना झोपवतात’ हा आनंददायक व्हिडिओ व्हायरल झाला.

ज्यामध्ये जेमी लीव्हरने प्रसिद्ध सेलिब्रिटी मॉम्स, प्रियांका चोप्रा जोनास, करीना कपूर खान, सोनम कपूर आहुजा आणि फराह खान यांची नक्कल केली आहे. बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या मुलांसोबत घरात कशाप्रकारे वागतात, विशेषतः त्या त्यांच्या मुलांना कशा झोपवत असतील, याचा अतिशय गंमतीशीर व्हिडिओ जॅमीने बनविला आहे. यात ती बॉलिवूडच्या काही ग्लॅमरस आयांची मजेशीर अन्‌ हुबेहूब नक्कल करताना दिसत आहे.

जॅमी लिव्हरचे वडील जॉनी लिव्हर यांचे चाहते जगभर आहेत. ते एक सुप्रसिद्ध कॉमेडियन आहेत. जॅमीनं आपल्या नवीन व्हिडीओत करिना कपूरची नक्कल करत म्हटलं आहे, ”झोप लवकर बाळा कारण पॅप्स सकाळी येणार आहेत..”, इथे जॅमी करीनाच्या ‘पू’ व्यक्तिरेखेप्रमाणे हेल काढून बोलताना दिसत आहे.

जॅमीच्या या व्हिडीओला ६ लाखाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. यावरून आपण अंदाज लावू शकता की या व्हिडीओला किती पसंती मिळाली आहे. चाहतेच नाहीत तर रवीना टंडनने देखील जॅमीच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिची प्रशंसा केली. रवीना व्यतिरिक्त प्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेंस लुईसने देखील व्हिडीओला लाइक केलं आहे.

जेमी लीव्हरची ही इंस्टाग्राम रील, ‘सेलेब्स पुटिंग किड्स टू स्लीप’, प्रचंड व्हायरल झाली. तिला या मिमिक्रीसाठी सोशल मीडियावर खूप प्रेम मिळाले. ती तिच्या कॉमिक टाइमिंग आणि मिमिक्री कौशल्यांसाठी प्रसिद्ध आहेच, सोबतच जेमीने अनेक चित्रपटांमध्ये तिच्या अभिनय कौशल्याची क्षमता सिद्ध केली आहे. जेमीने ‘किस किसको प्यार करूं’, ‘हाऊसफुल ४’ आणि ‘भूत पोलिस डॉट सी’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ती सिरीजमध्येही दिसणार आहे.