गँग रेपला उत्तेजन देणाऱ्या परफ्युमच्या जाहिराती...

गँग रेपला उत्तेजन देणाऱ्या परफ्युमच्या जाहिरातीवर भडकले बॉलिवूडचे सितारे; हे लज्जास्पद आणि विकृत – म्हणते प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra, Swara Bhasker And Other Bollywood Celebs Slam Perfume Ad Promoting Gang Rape Culture, Call It- Shameful and Disgusting)

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) पासून फरहान अख्तर (Farhan Akhtar), ऋचा चड्ढा (Richa Chaddha) आणि स्वरा भास्कर (Swara Bhaskar) या कलाकारांनी एका परफ्युमच्या जाहिरातीवर (perfume ad) आपला तीव्र निषेध व्यक्त केला आहे. अशाप्रकारच्या जाहिराती (Slams Commercial) कशा बनवल्या जातात आणि त्यांना परवानगी कशी दिली जाते? या उघडपणे गँग रेप (Gang Rape Culture) ला उत्तेजन देणाऱ्या जाहिराती आहेत, असे या सेलिब्रेटींचे म्हणणे आहे.

सदर जाहिरातीमध्ये असे दाखवण्यातले आहे की, एका मॉलमध्ये चार मुलं एकट्या मुलीला पाहून तिच्याबद्दल अश्लील बोलतात, ती मुलगी घाबरते पण शेवटी तिला कळते की ती मुलं तिच्याबद्दल नाही तर, डिओबद्दल बोलत आहेत. मग ती सुटकेचा नि:श्वास सोडते.

ही जाहिरात सामूहिक बलात्कार संस्कृतीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप या सेलिब्रिटींनी केला आहे. प्रियंका चोप्राने ट्विट करत म्हटले – ‘लज्जास्पद आणि विकृत…’ ही जाहिरात मंजूर करण्याकरिता कोणाकोणाची परवानगी घेतली गेली? किती लोकांना ही जाहिरात ठीक आहे, असे वाटते? परंतु आता याबाबतची दखल घेऊन मंत्रालयाने ही जाहिरात काढून टाकली असल्याने मला खूप आनंद आहे. भयानक!

त्याचवेळी ऋचा चढ्ढाने लिहिले  – ही जाहिरात म्हणजे कोणता ॲक्सिडेंट नाही. अशी जाहिरात बनण्यासाठी ब्रँडला अनेक प्रकारच्या निर्णयांतून जावे लागते. क्रिएटिव्हस्‌, स्क्रिप्ट, एजन्सी, क्लायंट्‌स, कास्टिंग इत्यादी. रेप म्हणजे सगळ्यांना विनोद वाटतो का? ही आश्चर्याची गोष्ट आहे! ही जाहिरात तयार करणाऱ्या या ब्रँडवर, एजन्सीवर अशा प्रकारची विचित्र जाहीरात दाखविल्याबद्दल कारवाई झाली पाहिजे.

फरहान अख्तरने लिहिले – गँग रेपचा प्रचार करणाऱ्या किंवा तसे सुचवणाऱ्या या विकृत विचाराच्या बॉडी स्प्रे जाहिरातींचा विचार करण्यासाठी, ती मंजूर करण्यासाठी आणि बनवण्यासाठी तेवढेच विकृत मन लागते!! हे अतिशय लाजिरवाणे आहे!

तर स्वरा भास्करनेही या जाहिरातीवर जोरदार तोंडसुख घेतले, तिने ट्विटमध्ये म्हटले की, भारतात गँग रेपसारख्या घटना घडतच असतात. हैदराबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. अशा प्रकारची जाहिरात करणारी कंपनी आपल्या जाहिरातींमध्ये बलात्कार आणि सामूहिक बलात्कारासारखा विषय इतक्या सहजपणे दाखवत आहे. हे खरोखर निंदनीय आहे. हा अपराध तर आहेच शिवाय लज्जास्पद आहे. एजन्सीने हे काय बनवले आहे?

चाहते आणि युजर्स या सेलिब्रिटींना समर्थन देत असतीलही, परंतु बरेच चाहते असेही म्हणत आहेत की, ही जाहिरात अश्लील किंवा चुकीची असली तरी बॉलीवूड चित्रपटही कमी नाहीत आणि ते गँग रेप संस्कृतीला या जाहिरातीपेक्षा अधिक प्रोत्साहन देतात. खासकरून लोक स्वरा भास्करवर राग व्यक्त करत आहेत. चाहता स्वरालाही विचारतोय की जाहिरातीवर इतक्या पटकन प्रतिक्रिया देतेस तर यासिन मलिकवर का नाही?

नेटकरी स्वराने चित्रपटांत दिलेल्या बोल्ड सीन्सबद्दल तिला जाब विचारत आहेत. स्वरा असो वा प्रियंका किंवा फरहान सुद्धा सगळ्यांनाच युजर्स हेच सांगताहेत की, आता विरोध करून काय होणार? तुम्ही चित्रपटात स्वतः जेव्हा अशा प्रकारची भूमिका करून लोकांच्या गळी उतरवता. ते चुकीचे नाही आहे का?

काही युजर्स असंही म्हणताहेत की ही जाहिरात बनविणारे बरेच हुशार आहेत, ज्यांनी जाहिरात टीव्हीवर प्रदर्शित करण्यापूर्वीच इतकी पब्लिसिटी मिळवली. वाद निर्माण करा आणि प्रसिद्ध व्हा.

तर काहींना खरोखर असं वाटतंय की अशाप्रकारच्या जाहिराती बनविणाऱ्या निर्मात्यांना कडक शासन झाले पाहिजे.