प्रियंका चोप्राने जगाला सांगितलं मंगळसूत्राचं म...

प्रियंका चोप्राने जगाला सांगितलं मंगळसूत्राचं महत्त्व, म्हणाली – ‘लग्नात मंगळसूत्र घातलं तो क्षण माझ्यासाठी खास होता.’ (Priyanka Chopra Speaks About Values Of Mangalsutra, Recalls How She Felt When She Wore It For The First Time)

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राने गायक निक जोनससोबत लग्न करून परदेशातच संसार थाटला असला तरी आजही ती मनाने भारतीय आहे. आपल्या भारतीय परंपरेशी ती आजही निगडीत आहे, हे वेळोवेळी तिने दर्शविले आहे. परदेशातही ती सर्व भारतीय सण धुमधडाक्यात अन्‌ पारंपरिक पद्धतीने साजरे करताना दिसते. तिच नाही तर निक जोनसदेखील भारतीय परंपरांचा आदर करताना दिसतो. आता पुन्हा एकदा प्रियंकाने मंगळसूत्राचं महत्त्व सांगून आपण भारतीय परंपरांशी किती जोडलेले आहोत हे दाखवून दिलं आहे.  

प्रियंकाने नुकतीच एका ज्वेलरी ब्रॅण्डची जाहिरात केली आहे. ज्यात तिने मंगळसूत्राचं महत्त्व सांगितलं आहे. तिने याचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रियंका म्हणाली, ‘मंगळसूत्र घालणं ही आपली परंपरा आहे. मी जरी स्वत:ला मॉडर्न समजत असले तरी मी काही परंपरांना मानते, त्यातलीच ही एक परंपरा आहे. काळा रंग वाईट नजरेपासून वाचवतो. मंगळसुत्रात काळे मणी असतात. मला मंगळसूत्र घालायला आवडतं.’

प्रियंकाने या व्हिडिओत तिचा पहिल्यांदा मंगळसूत्र घातल्याचा अनुभव शेअर केला आहे. ‘मी जेव्हा पहिल्यांदा मंगळसूत्र घातलं तो क्षण माझ्यासाठी खास होता. मला तो क्षण आजही आठवतो. माझ्या पुढच्या पिढीतील मुली कदाचित वेगळ्या पद्धतीने ही परंपरा आपलीशी करतील.’ असं तिनं म्हटलं आहे.

२०१८ मध्ये प्रियंका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनसशी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीनं लग्न केलं. लग्नानंतर प्रियंकाने अनेकदा आपलं मंगळसूत्र फ्लॉन्ट केलं आहे.