प्रियंका चोप्राने पती निक जोनसचा ३० वा वाढदिवस ...

प्रियंका चोप्राने पती निक जोनसचा ३० वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात केला साजरा, फोटो शेअर करत लिहिली भावूक नोट (Priyanka Chopra shares Unseen Pics From Nick Jonas’ 30th Birthday Celebrations; Pens Heartfelt Note For Hubby)

अलिकडेच प्रियंका चोप्राने पति निक जोनसचा 30वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. आता तिने निकच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंसोबतच प्रियंकाने एक प्रेमळ आणि भावूक नोट लिहिली आहे.

ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. आपल्या बिझी शेड्युलमधून फुरसत मिळताच स्वतःच्या खाजगी आणि प्रोफेशनल आयुष्याशी निगडीत फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर अगदी आत्ताचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो निक जोनसच्या ३० व्या वाढदिवसाचे आहेत.

प्रियंकाने शेअर केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर निकच्या बर्थ डे पार्टीची थीम व्हाइट होती असे दिसते. वाढदिवसाच्या निमित्ताने आपले कुटुंब आणि मित्र परिवारासोबत प्रियंका आणि निक खूप मजा करताना दिसले.

हे फोटो पोस्ट करताना प्रियंकाने निकसाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे, त्यात तिने लिहिलंय “हॅपी बर्थ डे माय लव. तुझ्या आयुष्यात कायम आनंद आणि चेहऱ्यावर हास्य असू दे. माझे तुझ्यावर प्रेम आहे @nickjonas. या वीकेंडला मी अतिशय आनंदी होते. या आठवड्याची सुरुवात पती निकच्या ३०व्या वाढदिवसाच्या साजरीकरणाने झाली आणि शेवटी हा आनंद अधिक वृद्धिंगत झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे मित्र आणि नातलगांनी आमचे घर प्रेम आणि आनंदाने भरून टाकले. @scottsdalenational मध्ये आमचे घर आहे. एका अविश्वसनीय व्यक्तीसाठी परिपूर्ण उत्सव आयोजित करण्यात मला मदत केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते.”

निक जोनस त्याचा जन्मदिवस १६ सप्टेंबरला साजरा करतो. परंतु या वर्षी त्याचा ३० वा वाढदिवस खास बनवण्यासाठी पत्नी प्रियंका चोप्राने त्याच्यासाठी मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते.