आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोप्...

आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोप्राने प्रसारित केले बालपणीचे अप्रकाशित फोटो (Priyanka Chopra Shares Unseen Childhood Pic With Father On His Birth Anniversary)

प्रियंका चोप्राने आपले पिताजी डॉ. अशोक चोप्रा यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक अतिशय छान फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या बालपणीचा आहे. यात ती आपल्या वडिलांसोबत बर्फावर खेळताना दिसते आहे. या फोटोवर तिचे चाहते व नवरा निक जोनास यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

इन्स्टाग्रामवर प्रसारित केलेले तिचे हे फोटो यापूर्वी कधीच न पाहिलेले आहेत. हा फोटो काश्मीर सहलीचा आहे. त्यात ते बर्फात खेळताना दिसत आहेत. लोकरी कपडे घातलेली छोटीशी प्रियंका त्यात खूपच गोड दिसते आहे.

सोबत प्रियंकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – ‘हॅपी बर्थ डे डॅड! आम्ही तुम्हाला दररोज मिस करतो.’ सोबत तिने लाल रंगातील हार्टचे इमोजी टाकले आहेत. प्रियंकाच्या या फोटोवर तिचा नवरा निक जोनासने आवड व्यक्त केली आहे.

प्रियंकाच्या लहानपणीचा हा अप्रकाशित फोटो पाहून हिना खान, खुशी कपूर, अंशुला कपूर यांनी प्रतिक्रिया दिल्यात. शिवाय तिचे चाहते सकारात्मक कमेंटस्‌ देत आहेत.

एकाने म्हटले की, हे मोस्ट अडोरेबल पिक्चर आहे! दुसरा युजर म्हणतो, अगदी वडिलांसारखी दिसते.

प्रियंकाच्या कामकाजाबाबत बोलायचं तर तिच्याकडे बरीच कामे आहेत. ‘एन्डिन्ग थिंग्ज्‌ आयटी कॉल कमिंग बॅक टू मी’, ‘जी ले जरा’ हे दोन चित्रपट येत आहेत.