आईच्या वाढदिवसानिमित्त प्रियंकाने शेअर केला तिच...

आईच्या वाढदिवसानिमित्त प्रियंकाने शेअर केला तिच्या लेकीचा गोड फोटो, अनोख्या अंदाजात दिल्या शुभेच्छा (Priyanka Chopra shares cute pic of daughter Malti to wish her mom on her birthday)

बॉलिवू़डची ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिथे ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींचे अपडेटस् चाहत्यांना देत असते. प्रियंका यावर्षी सरोगसी पद्धतीचा वापर करुन एका मुलीची आई झाली आहे. तिची ही गुड न्यूज ऐकून सगळेच खूप आनंदी झाले.

पण सध्यातरी प्रियंकाने तिच्या मुलीला सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. ती तिच्या लेकीचा चेहरा कधी दाखवणार याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. यावेळी मात्र तिच्या चाहत्यांची मागणी लक्षात घेता प्रियंकाने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या बाळाची छोटीशी झलक दाखवली.

16 जून 2022 ला मध्यरात्री प्रियंकाने तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट टाकली. त्या फोटोत तिची छोटीशी लेक मालती मेरी चोप्रा जोनस आणि आई मधु चोप्रा दिसत आहेत. त्या फोटोत प्रियंकाच्या आईने म्हणजेच मधु चोप्रा यांनी त्यांच्या नातीला कुशीत घेतले आहे. तर प्रियंका तिच्या बाळाला प्रेमाने पाहत आहे. या गोड फोटोसोबत प्रियंकाने तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आईला खास अंदाजात शुभेच्छा देताना प्रियंकाने लिहिले, वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. तू तुझ्या या सकारात्मक हास्याने नेहमी हसत रहा. आयुष्यासाठीचा तुझा उत्साह आणि रोजच्या तुझ्या अनुभवामुळे आम्ही नेहमीच प्रेरित होतो. माझ्या माहिती प्रमाणे तुझी युरोपची सोलो ट्रिप ही तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट बर्थडे सेलिब्रेशन होतं. प्रियंकाने पुढे तिच्या बाळातर्फे तिच्या आजीला शुभेच्छा देत ‘लव यू टू मून अॅण्ड बॅक टू नानी’ असा संदेश लिहिला.

प्रियंकाने फोटो शेअर करता क्षणी वेगवेगळ्या सेलिब्रेटी आणि तिच्या चाहत्यांनी त्या फोटोवर कमेंट करण्यास सुरुवात केली. या फोटोवर प्रियंकाचा नवरा निकने केकच्या इमोजीने कमेंट केली आहे.यापूर्वी प्रियंकाने मदर्स डे ला पहिल्यांदा तिच्या मुलीचा फोटो शेअर केला होता. त्या फोटोत प्रियंकाने तिच्या लाडक्या लेकीला कुशीत घेतले होते. तर निक तिला प्रेमाने पाहत होता. या फोटोसोबत प्रियंकाने तिची मुलगी किती अडचणींचा सामना करुन जन्माला आली ते सांगितले. मालतीला 100 दिवस एनआयसीयू मध्ये ठेवल्यावर घरी आणले होते.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस याच वर्षी सरोगसीद्वारे आईवडील झाले आहेत. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा असे ठेवले. या नावात प्रियंकाची आई आणि सासूचे नाव सहभागी आहे.