लाल-काळी बिकिनी घालून प्रिय...

लाल-काळी बिकिनी घालून प्रियंका चोप्राने शेअर केले, नवऱ्यासोबतचे बोल्ड फोटो (Priyanka Chopra Shares Bold Photos In Red And Black Bikini With Husband)

Priyanka Chopra, Bold Photos, Red And Black Bikini

इंटरनॅशनल स्टार झालेली प्रियंका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनास, हे जोडपे वेळात वेळ काढून फुरसतीचे क्षण मौजमस्तीत घालवतात, त्यानुसार हल्लीच प्रियंकाने लाल-काळी बिकिनी घालून, निक सोबत मौजमस्ती करत असलेले फोटो शेअर केले आहेत. तिच्या या उत्तान फोटोंनी सोशल मीडियाचे तापमान वाढले असल्यास नवल नाही.

Priyanka Chopra, Bold Photos, Red And Black Bikini

‘सिटाडेल’ या वेब सिरिजचे लंडनमधील शूटिंग संपवून प्रियंका घरी आली असावी. अन्‌ आपल्या नवऱ्यासोबत गंमतजंमत करत असलेले रोमॅन्टिक फोटो तिने इन्स्टाग्रामवर टाकले आहेत.

या फोटोंमध्ये प्रियंका पोटावर झोपली आहे. लाल आणि काळी बिकिनी घातलेली प्रियंका अतिशय हॉट दिसते आहे. उघड्या अंगाने निक जोनास तिच्या नितंबावर सुरी टोचतो आहे. प्रियंका हसतमुखाने त्याला प्रतिसाद देत आहे.

Priyanka Chopra, Bold Photos, Red And Black Bikini

प्रियंकाचे हे फोटो लगोलग व्हायरल झालेत. तिचं हे बिकिनीतील रूप पाहून काही जण वेडावलेत. तर काही लोकांना खटकलं आहे. प्रियंकाची चुलत बहीण परिणीती चोप्राने कमेंट दिली, “जीज, मिमी दीदी, हे काय चाललं आहे? इन्स्टाग्राम वर फॅमिली पण आहे.”

Priyanka Chopra, Bold Photos, Red And Black Bikini

यानंतर प्रियंकाने आणखी एक उत्तान फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यात बिकिनीमध्ये ती आपले अंगप्रदर्शन व्यवस्थित करते आहे. ‘संडे इस तरह का’ अशी कॅप्शन तिने सोबत जोडली आहे. या फोटोवर निक जोनासने ‘यम्मी’ अशी कमेंट दिली आहे. प्रियंकाच्या या अतिशय हॉट लूकवर तिच्या मित्रांनी भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Priyanka Chopra, Bold Photos, Red And Black Bikini

प्रियंकाच्या कामकाजाबद्दल बोलायचं झालं तर गेले काही दिवस ती ‘सिटाडेल’ या वेब सिरिजच्या चित्रणात व्यस्त होती. त्याच्या सेटवरील फोटो तिने इन्स्टाग्राम वर शेअर केले होते.