प्रियंका चोप्राने नवऱ्यासोबत केले रोमॅन्टिक न्य...

प्रियंका चोप्राने नवऱ्यासोबत केले रोमॅन्टिक न्यू ईयर सेलिब्रेशन : दोन दिवसांनी शेअर केले फोटो (Priyanka Chopra shares a glimpse of her new year celebrations: Gets Cozy With Nick Jonas)

न्यू ईयर २०२२चे सर्व सेलिब्रिटीनी आपापल्या अंदाजाने स्वागत केले. सोशल मीडियावर आपल्या न्यू ईयर सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट करून या सेलिब्रिटींनी आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. आपली देसी गर्ल प्रियंका चोप्रानेही नवऱ्यासोबत अतिशय रोमॅन्टिक होत न्यू ईअर सेलिब्रेशन करून दोन दिवसांनंतर त्याचे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्याद्वारे तिने तिच्या चाहत्यांना नवीन वर्ष कसे साजरे केले याची झलक दाखवली आहे. या फोटोंमध्ये प्रियंका तिचा पती आणि गायक निक जोनससोबत दिसत आहे. या फोटोंना कॅप्शन देत तिनं लिहिलंय, ‘फोटो डंप… मित्र आणि कुटुंबियांचे खूप आभार. असे नवीन वर्ष साजरे करा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.’

प्रियंकाने न्यू ईयर सेलिब्रेशन कोठे केलं ते पोस्टमध्ये सांगितलं नसून हा स्वर्ग आहे असे म्हटले आहे. पार्टीतील एका फोटोमध्ये प्रियंकाने मॅक्सी ड्रेस घातला आहे आणि निक जोनसच्या मांडीवर डोकं ठेवून ती झोपलेली दिसत आहे. निकने कलरफूल शर्ट घातला असून दोघंही छान रोमॅन्टिक मूडमधे दिसत आहेत.

एका फोटोत प्रियंका ऑरेंज बिकिनी घालून सोनेरी सूर्यकिरणांचा आनंद लुटताना दिसली आहे. फोटोत प्रियंका आणि निकचे मित्र-मैत्रिणी बोटीवर धमालमस्ती करतानाही दिसत आहेत. या सगळ्यांनी चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला निक जोनसने इंस्टाग्रामवर प्रियंका चोप्रासोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये प्रियंका चोप्राला किस करताना निक जोनसने लिहिले होते, ‘माय फॉरएव्हर न्यू इयर किस.’

सध्या प्रियंका चोप्रा आपल्या ‘द मॅट्रिक्स रीसरेक्शन्स’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘द मॅट्रिक्स रीसरेक्शन्स’ मध्ये प्रियंकाने एका सतीची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील प्रियंकाची भूमिका छोटी असली तरी प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. तेच काहींनी छोटा रोल स्वीकारल्यामुळे तिला ट्रोलही केलं आहे. परंतु प्रियंकाने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देऊन चुप केले आहे.