जगातील सर्वाधिक मागणी असलेल...

जगातील सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्रींमध्ये प्रियंका चोप्रा अव्वल नंबरवर…बॉलिवूडची ही अभिनेत्रीही आहे यादीत (Priyanka Chopra Reached The Top In The List Of Most In Demand Actresses In The World, This Bollywood Actress Also Reached This List)

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा डंका मिरवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राची जेवढी प्रशंसा करावी तेवढी थोडी आहे. प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण असलेली प्रियंका चोप्रा, आजच्या काळात ग्लोबल आयकॉन आहे. आता याची पुष्टी करत, पॉवर आयकॉनने पुन्हा इतिहास घडवण्याचे काम केले आहे. होय. प्रियंका चोप्राने अलीकडेच जगातील सर्वाधिक मागणी असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे.

Priyanka Chopra, Most In Demand Actresses In The World

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

उल्लेखनीय बाब म्हणजे, बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि अल्लू अर्जुननंतर प्रियांका चोप्रा ही सदर टॉप 10 च्या यादीत दोन महिला स्टार्सपैकी एक आहे. पॅरेट अॅनालिटिक्सने जगभरातील मागणीच्या आधारावर सेलेब्सचे मूल्यांकन केल्यानंतर ही माहिती प्रसारित केली आहे.

Priyanka Chopra, Most In Demand Actresses In The World

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीलाही टॉपच्या या यादीत स्थान मिळाले आहे, ही खूप अभिमानाची बाब आहे. ‘शेरशाह’ चित्रपटाच्या यशानंतर कियाराची मागणी खूप वाढली आहे. कियारा एकमेव महिला अभिनेत्री बनली आहे, जिने प्रियांका चोप्रासह तिच्या नावाचा समावेश जगातील सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्रींच्या यादीत केला आहे.

Priyanka Chopra, Most In Demand Actresses In The World

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

अवघ्या काही वर्षांतच आपल्या अद्‌भूत अभिनय प्रतिभेने जगभरात आपली छाप सोडणारी बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने आंतरराष्ट्रीय आयकॉनमध्ये स्वतःची ओळख निर्माण करून सर्वांनाच गौरविले आहे. त्यामुळे आता तिचा आत्मविश्वास अधिक उंचावला असून आणखी मेहनत करून ती तिचे काम करेल. जेणेकरून तिचे नाव केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात चमकत राहील.

Priyanka Chopra, Most In Demand Actresses In The World

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

प्रियंका चोप्रा आणि कियारा अडवाणीने ग्लोबल आयकॉन टॉम हिडलेस्टन, दुलकर सलमान, सलमान खान, सुमग हूं, महेश बाबू, जेनिफर लोपेज, क्रिस इवांस, स्कारलेट जोहानसन आणि जेंडाया यांसारख्या सुपरस्टार्स सोबत आपलं नाव सर्वोच्च ठिकाणी नेलं आहे, ही सामान्य बाब नाही. तसं पाहिलं तर प्रियंकाचे या यादीत नाव येणं यात नवल नाही, कारण मागील काही वर्षांपासून ती संपूर्ण जगात सूपरिचीत झालेली आहे.