स्पेनच्या समुद्रकिनारी बिकिनीतले मदमस्त फोटो का...
स्पेनच्या समुद्रकिनारी बिकिनीतले मदमस्त फोटो काढून प्रियंका चोप्रा जोनसने केला कहर (Priyanka Chopra Jonas Bold Bikini Photos From Spain Vacation Goes Viral)

बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी आपली देसी गर्ल प्रियंका चोप्रा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रकाशझोतात असते. या देसी गर्लचा सध्याचा बोल्ड व अधिक ग्लॅमरस अवतार पाहिल्यानंतर, सातासमुद्रापलीकडे जाऊन ती तेथील रंगात समरसून गेलेली दिसते. हल्लीच प्रियंकाचे काही बोल्ड फोटो पाहावयास मिळाले जे सोशल मीडियावर प्रचंड पसंती दर्शवित आहेत.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
प्रियंका चोप्रा जोनस सध्या स्पेनमध्ये आहे, येथील पोर्ट शहर वालेंसिया येथे ती आपले मित्र आणि कुटुंबियांसोबत सुट्टी घालवत आहे. स्पेनच्या समुद्रकिनारी बिकिनीतले मदमस्त फोटो काढून प्रियंका चोप्रा जोनसने कहर केला आहे.


फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
प्रियंका चोप्रा या फोटोंमध्ये लाल रंगाच्या बिकिनीत आणि पिवळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये दिसत आहे. बिकिनी घालून तिने समुद्रात डुंबण्याचीच मजा घेतली नाही तर जेट स्की रायडिंगचीही मजा लूटली आहे.
आपल्या नेहमीच्या व्यस्त दैनंदिनीतून ब्रेक घेत प्रियंका आपली आई आणि मित्रांसोबत स्पेनच्या वालेंसिया येथे गेली आहे. तेथे तिने लाल बिकिनी आणि पिवळ्या स्विमसूटवर व्हाइट श्रगही घेतला आहे. तिच्यासोबत तिची आई व पेट डॉग डायनाही दिसताहेत. तिने या फोटोंना कॅप्शन देत लिहिलंय की, ‘एक परफेक्ट डे ऑफ…’ तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून या पोस्टवर तिच्या पतीने अर्थात निकने damn girl अशी कमेंट केली आहे.


प्रियंकाने आपल्या सुंदर फोटोंसोबतच एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यात ती जेट स्की रायडिंगचा आनंद घेत असताना दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओलाही अनेक कमेंट्स दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये आयोजित ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल २०२१ या कार्यक्रमात प्रियंकाचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. तिच्या या लूकचीही सर्वत्र चर्चा झाली. प्रियांका चोप्राने तिच्या सोशल मीडियावर ग्लोबल सिटीझन लाईव्ह इव्हेंटचे फोटो शेअर केले, जे खूप व्हायरल झाले. या फोटोंमध्ये प्रियंका स्काय आणि ब्लॅक कलरच्या फ्लफी गाऊनमध्ये दिसली.

प्रियंकाच्या कामाबाबत बोलायचं तर लवकरच रिचर्ड मॅडेनसोबत ‘सिटाडेल’ नावाच्या मालिकेत ती दिसणार आहे. या स्पाय थ्रिलर मालिकेत प्रियंका आणि रिचर्ड मॅडेन व्यतिरिक्त, स्टेनली तुची, रोलँड मोलर आणि सारा मार्टिन्स दिसतील. या शोची निर्मिती रुसो ब्रदर्स आणि पॅट्रिक मोरन करत आहेत, ज्याचा प्रीमियर ॲमेझॉन प्राइमवर होणार आहे, परंतु त्याच्या प्रदर्शनाची तारिख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
सर्व फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम