प्रियंका चोप्रा ‘सिटाडेल’ या वेब सी...
प्रियंका चोप्रा ‘सिटाडेल’ या वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान जखमी, अभिनेत्रीने शेअर केला दुखापतग्रस्त सेल्फी (Priyanka Chopra Injured During shooting Of Web Series ‘Citadel’, Actress Shares Blood Stained Selfie)

आंतरराष्ट्रीय स्टार बनलेली प्रियंका चोप्रा सध्या तिच्या आगामी वेब सिरीज ‘सिटाडेल’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने वेब सीरिजच्या सेटवरील काही चित्रे शेअर केली आहेत. या चित्रांमध्ये प्रियंकाच्या चेहऱ्यावरून रक्त वाहताना दिसत आहे. रक्ताने माखलेली ही चित्रे शेअर करत प्रियंकाने लिहिले आहे की ‘सिटाडेल’ या वेब सीरिजचे शूटिंग करताना तिला ही दुखापत झाली आहे.

देसी गर्ल प्रियंका चोप्रा सद्या लंडनमध्ये आपल्या पहिल्या वेब सीरिज सिटाडेलच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आपल्या या व्यस्त शूटिंगमधूनही वेळ काढत ती सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. अलीकडेच या अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर असे काही फोटो शेअर केले आहेत की ते पाहिल्यानंतर तिचे चाहते आणि प्रशंसकही चिंताग्रस्त झाले आहेत.

प्रियंकाने शेअर केलेल्या या सेल्फी फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर जखम झालेली आणि त्यातून रक्त येत असल्याचे दिसत आहे. जखम झालेला हा सेल्फी तिने आपल्या इन्स्टाग्रामवरील स्टोरी सेक्शनमध्ये शेअर केला आहे.
प्रियंकाचे रक्त लागलेले फोटो पाहून चाहते हैराण आहेत. तिने आपले दुखापत झालेले सेल्फी पाठवून तिला ‘सिटाडेल’ या वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान ही दुखापत झाली आहे, असं लिहिलं आहे.

प्रियंकाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर पट्टी लावलेली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या कपाळावरून रक्त वाहत असलेलं दिसत आहे, तसेच तिच्या भुवईवर छोटा कट दिसत आहे. ही छायाचित्रं पोस्ट करून अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांनाच प्रश्न विचारला आहे की, ‘हे खरं आहे की नाही?’ प्रियंकाचे दुखापत झालेले हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. तिचे चाहते कमेंट करत तिला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.
हे फोटो सिटाडेल च्या शूटिंग दरम्यानचेच आहेत अन् आपल्याला भुवईच्या वर जखम झाली आहे. परंतु कपाळावरील रक्त खरं नसून ते खोटं आहे. तो मेकअप केला आहे, असे प्रियंकाने आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे.

प्रियंकाच्या कामाबद्दल सांगायचं तर सध्या तिच्याकडे ‘सिटाडेल’ व्यतिरिक्त इतरही काही चित्रपट आहेत. टॉम क्रूझच्या ‘मिशन इम्पॉसिबल 7’ मध्ये ती दिसणार आहे. हॉलिवूड शिवाय बॉलिवूडमध्येही प्रियंका कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत आपल्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे.