प्रियंका चोप्राने लेक मालती मेरीची एक झलक दाखवू...

प्रियंका चोप्राने लेक मालती मेरीची एक झलक दाखवून वाढवली उत्कंठा (Priyanka Chopra finally reveals daughter Malti Marie face)

अलिकडे बॉलिवूडमधील कलाकारांचे अर्थात नट-नटींचे डेटिंगपासून साखरपु्‌डा, मग लग्नातील सोहळे, त्यानंतरचं गरोदरपण आणि या सगळ्या सोहळ्यांचे फोटोज आणि व्हिडिओज म्हणजे त्या त्या कलाकारांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते.  पुढे या कलाकारांना मूल झाल्यानंतर बाळांचे चेहरे चाहत्यांना दाखवण्याचा त्यांचा अंदाज मात्र भारी विलक्षण असतो. करीनाच्या जेहपासून ही सुरुवात झाली बहुतेक… मुलाचा चेहऱ्यावर मास्क किंवा हार्टचा सिम्बॉल ठेवून बाळाचं दर्शन घडवायचं. आणि यथावकाश एखाद्या मुहूर्तावर चेहरा दाखवायचा. काल परवाच सोनम कपूर आपल्या वायूला घेऊन बाहेर पडली त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो न होतो तोच आज देसी गर्ल प्रियंकाने आपल्या लेकीची मालती मेरीची एक झलक चाहत्यांना दाखवली आहे.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा अनेकदा तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबत फोटो शेअर करत असते. मात्र या फोटोत ती तिचा चेहरा स्पष्ट दिसू देत नाही. त्यामुळे काही वेळा तिचे फॅन्स तिच्यावर नाराजही होतात. पण आज काही वेगळं चित्र पाहायला मिळतयं.

प्रियंकाने तिच्या चाहत्यांसाठी मालतीचा नवीन फोटो पोस्ट केलायं. आज पहाटे प्रियंकाने इंस्टाग्राम स्टोरीवर मालती मेरीचा झोपलेला फोटो शेअर केलाय. या फोटोत, मालती मेरी चोप्रा जोनास बेबी स्ट्रॉलरच्या आत एका बाजूला झोपली आहे. बाळाने पांढऱ्या रंगाचं स्वेटर आणि गुलाबी टोपी घातलेली आहे. आणि तिच्याभोवती शाल गुंडाळलेली दिसतेय. प्रियंका याआधी मुलीचा चेहरा हृदयाच्या इमोजीने लपवायची मात्र तिने आज मालतीचा ओझरता चेहरा उघड केला. तिचे डोळे उबदार टोपीने झाकलेले होते तरी तिचे ओठ या फोटोत दिसताहेत.

ती झोपली असताना तिचा एक हात ब्लँकेटमधून दिसतोय. फोटो शेअर करताना प्रियांकाने पोस्टला कॅप्शन दिले, ” मला म्हणायचंय…” अनेक लोकांनी मालतीच्या या फोटोवर कमेंट करत या चिमुकलीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. कुणी तिला सुंदर राजकुमारी म्हणतंय तर कुणी तिचे ओठ पाहून ते निकसारखे आहेत, असे म्हणताहेत.

प्रियंकाने डिसेंबर २०१८ मध्ये जोधपूरच्या पॅलेसमध्ये निक जोनाससोबत लग्न केले. जानेवारी २०२२ मध्ये, जोडप्याने सरोगसीद्वारे मुलगी मालती मेरीचे स्वागत केल्याचं चाहत्यांसोबत जाहिर केलं.

‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ आणि ‘सिटाडेल’ या सिरीजमध्ये प्रियंका दिसणार आहे. तसंच प्रियांका ‘जी ले जरा’ या हिंदी चित्रपटात दिसणार आहे. जो फरहान अख्तर दिग्दर्शित असेल. यात तिच्यासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहे.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)