निक जोनासने प्रियंका चोप्राचा वाढदिवस समुद्र कि...

निक जोनासने प्रियंका चोप्राचा वाढदिवस समुद्र किनारी साजरा केला : प्रिय पत्नीचे चुंबन घेत केला प्रेमाचा वर्षाव (Priyanka Chopra celebrates birthday with Nick Jonas in a beachside party, See Inside Pics)

अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या ग्लोबल आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहे. प्रियंकाने काल १८ जुलैला तिचा ४० वाढदिवस साजरा केला. आपल्या लेडी लव्हचा वाढदिवस खास बनवण्यासाठी निक जोनासने एका प्रायव्हेट पार्टीचे आयोजन केले होते, त्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका निकसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे.

प्रियांका चोप्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो निक जोनासने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रियांकाला जुलै ऑफ ज्वेल म्हणत  तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करुन, निक जोनासने आपल्या पत्नीचा वाढदिवस खास बनवण्यासाठी एक चांगला नवरा ज्या प्रमाणे प्रयत्न करतो त्याचप्रमाणे सर्व गोष्टी केल्या आहेत. हे फोटो शेअर करताना निकने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘‘मेरे जुलाई के ज्वेल को हॅप्पिएस्ट बर्थडे‘. आयुष्याच्या या मजेदार प्रवासात तू सोबत असल्याचा खूप अभिमान वाटतो. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.” प्रियांकानेही पतीच्या प्रेमळ पोस्टवर  ‘लव्ह ऑफ माय लाईफ’ अशी कमेंट केली आहे.

प्रियांका आणि निकच्या या प्रायव्हेट पार्टीचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हे कपल समुद्र किनाऱ्यावर दिसत आहे. एका फोटोत दोघेही समुद्रकिनारी एकमेकांचे चुंबन घेताना दिसत आहेत.

एका फोटोमध्ये प्रियांका निकसोबत डिनर टेबलवर दिसत आहे. त्यावेळी तिच्या हातात एक बोर्ड आहे, ज्यावर, ‘हॅप्पी बर्थडे प्रियांका, 80 बेबी!’  लिहिले आहे.  याशिवाय प्रियांका-निक सेलिब्रेशन करत रात्री फटाके उडवत आहेत. या दोघांचे बाँडिंग आता चाहत्यांची मने जिंकत आहे.

प्रियंका आणि निकने नुकतेच सरोगसीच्या माध्यमातून एका मुलीचे पालक बनले आहेत. मुलगी मालती मेरीचे आयुष्यात आगमन झाल्यामुळे ते खूप आनंदी आहेत.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम