देसी गर्ल प्रियंका चोप्रा बनली ग्लोबल सुपर पॉवर...

देसी गर्ल प्रियंका चोप्रा बनली ग्लोबल सुपर पॉवर (Priyanka Chopra Becomes Global Superpower, This International Magazine Gave This Title To Priyanka)

देसी गर्ल प्रियंका चोप्रा आधी ग्लोबल स्टार होतीच; आता एका इंटरनॅशनल मॅगझीनने प्रियंकाला ग्लोबल सुपर पॉवरचा किताब बहाल केला आहे. पाहुया प्रियंकाच्या या नव्या यशाचे फोटो…

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत मजल मारत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या प्रियंका चोप्राने आता एक नवीन यश संपादन केले आहे.  इंटरनॅशनल मॅगझीन वोग ऑस्ट्रेलियाने आपल्या जूनच्या अंकासाठी कव्हर पेजवर प्रियंका चोप्राला खास जागा दिली आहे. या मॅगझीनने प्रियंकाचा सुंदर फोटो आपल्या कव्हर पेजवर छापून तिला ‘ग्लोबल सुपर पॉवर’ असा किताब दिला आहे.

प्रियंकाने या मॅगझीनच्या कव्हर पेजचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या या नवीन यशासाठी चाहत्यांकडून तिला अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. मॅगझीनने कव्हरवरील प्रियंकाच्या फोटोला, ‘ ग्लोबल सुपर पॉवर प्रियंका चोप्रा जोनस आणि भारताची याचिका’ अशी स्लोगन दिली आहे. मॅगझीनच्या आत कव्हर स्टोरीमध्ये प्रियंकाबद्दल काय माहिती दिली आहे, ती मॅगझीन वाचल्यानंतरच कळणार आहे, तोपर्यंत तुम्ही कव्हर गर्ल प्रियंकाचे सुंदर फोटो पाहा.

कव्हरपेज सोबतच मॅगझीनमध्ये फीचर्स केलेले इतर फोटो देखील प्रियंकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियंका अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

प्रियंका चोप्रा आपल्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. या आधी प्रियंकाने बिलबोर्ड म्युझिक ॲवॉर्ड २०२१चे काही फोटो सोशल मीडियावर प्रदर्शित केले होते. या ॲवॉर्डच्या कार्यक्रमामध्ये प्रियंका पती निक जोनससोबत आली होती. प्रियंकाचा तो लूक आणि स्टाईल चाहत्यांना अतिशय आवडली असून ते तिची भरभरून प्रशंसा करत होते.

सदर बिलबोर्ड म्यूजिक अवॉर्ड्स २०२१ चे आयोजन अमेरिकेतील लॉस ऐंजेलिस येथे करण्यात आलं होतं. या अॅवॉर्ड शोसाठी प्रियंका चोप्राने न्यूड कलरचा शायनिंग थाई-हाई स्लिट ड्रेस घातला होता आणि त्यात ती अतिशय स्टनिंग दिसत होती. तर प्रियंकाचा पति निक जोनस याने कार्यक्रमासाठी ग्रीन कलरचा क्लासी जॅकेट घातला होता. अन्‌ त्या दोघांचाही लूक एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत होता.

प्रियंका चोप्राच्या या बोल्ड फोटोंनी सोशल मीडिया धमाका उडवून दिला आहे. काहींनी प्रियंकाच्या अशा फोटोंवर टीका केली आहे, तर काहींना प्रियंकाचा हा लूक अतिशय पसंत पडला आहे

प्रियंकाचं हे नवं यश आणि तिचा लूक कसा वाटला, आम्हाला कमेंट करून सांगा.