अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना प्रियंका चोप्...

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना प्रियंका चोप्राने घातले व्हॅक्सिनसाठी साकडे (Priyanka Chopra Appeals US President Joe Biden To Share More Vaccines)

करोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताला सर्वाधिक फटका बसलेला आहे. करोनाची सुनामी यावी अशी आपत्कालीन परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. या सर्व चिंताजनक परिस्थितीमुळे भावूक झालेल्या अभिनेत्री प्रियंका चोप्राने ट्वीटवरून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना व्हॅक्सिन पाठवण्यासाठी साकडे घातले आहे.

प्रियंकाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय्‌, ”मला खूप दुःख होतंय…भारतात करोनामुळे हाहाकार माजलाय, भारत करोनाशी झुंज देतोय…अमेरिकेने गरजेपेक्षा जास्त ५५० मिलियन इतक्या कोरनावरील लसी मागवल्या आहेत… संपूर्ण जगात या लसी उपलब्ध करून दिल्याबद्दल अॅस्ट्रोजेनेका यांचे खूप खूप आभार…परंतू माझ्या देशाची परिस्थिती खूपच नाजुक आहे…तर तुम्ही या लसी माझ्या देशात लवकरात लवकर पाठवू शकता का ?”. 

प्रियंकाने या ट्वीटमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, सेक्रेटरी ब्लिंकन आणि जॅक सुलिवन यांना टॅग केले आहे.

प्रियंकाच्या या ट्वीटवर लोकांकडून प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. त्यात काही लोकांनी आम्हाला व्हॅक्सिनच्या ऐवजी कच्चा माल हवा असल्याची मागणी केली आहे

प्रियंकाने यापूर्वी देखील ट्वीट करून आपल्या देशातील गंभीर परिस्थितीबाबत दुःख व्यक्त केले आहे आणि लोकांना जागरूक, सुरक्षित आणि सावधान राहण्यास सांगितले आहे.

प्रियंकाने देशाच्या मदतीसाठी इंटरनॅशनल स्तरापर्यंत आवाज उठवल्याबद्दल लोक तिचं कौतुक करत आहेत.

फोटो सौजन्य : ट्वीटर