पंतप्रधान मोदींनी घेतला कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस...

पंतप्रधान मोदींनी घेतला कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस (Prime Minister Narendra Modi Takes The Second Dose Of Covid-19)

आज सकाळी एम्स नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीचा दुसरा डोसही घेतला. पहिला डोस त्यांनी 1 मार्च रोजी घेतला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करताना त्यांनी इतर लोकांनीही ही लस घ्यावी असे आवाहन केले आहे. त्यांनी लिहिलंय, ‘लसीकरणाच्या मार्गाने कोरोनाचा पराभव होऊ शकतो. म्हणूनच, जर आपण लसीकरणाच्या अटींमध्ये बसत असाल तर अवश्य लस घ्या’

पंतप्रधान कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने पंतप्रधान मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान देशभरातील परिस्थितीचा आढावा घेतील. यापूर्वी मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही सद्यस्थिती आणि लसीकरणाबाबत ११ राज्यांच्या मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांची बैठक घेतली होती.