नववर्षाच्या स्वागतासाठी आलियाने घातलेल्या ड्रेस...

नववर्षाच्या स्वागतासाठी आलियाने घातलेल्या ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क…! (Price of Alia Bhatt New Year 2023 outfit)

बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री आलिया भट्टने यंदा पती रणबीर कपूरसह कुटुंब आणि मित्र परिवारासोबत नव वर्षाचं स्वागत केलं. आलियाने New Year सेलिब्रेशनचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर केले. आलियाने चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

पण यादरम्यान आलियाने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घातलेला ड्रेस चर्चेचा विषय ठरला आहे. पार्टीसाठी आलियाने साधा दिसणारा पण प्रचंड महागडा ड्रेस घातला होता. इतक्या साध्या ड्रेसची किंमत ऐकल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल.

आलियाच्या ड्रेसबद्दल सांगायचं झालं, तर knowtheirfashion या इंस्टा पेजवरुन आलियाने New Year सेलिब्रेशनसाठी घातलेल्या ड्रेसच्या किंमतीचा खुलासा केला आहे. आलियाने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घातलेल्या टॉपची किंमत ३३ हजार ५५१ रुपये आहे, तर ट्राउजरची किंमतव ४१ हजार ९८४ रुपये इतकी आहे.

आलियाचा ड्रेस पाहिला तर तो अत्यंत साधा दिसत आहे, पण अभिनेत्रीच्या ड्रेसची किंमत ७५ हजार ५३५ रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या आलिया नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घातलेल्या महागड्या ड्रेसची किंमत चर्चेचा विषय आहे.

आलियाची न्यू इअर पार्टी नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत आलियाने चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आलियासोबत रणबीर कपूर, बहिण शाहीन भट्ट आणि अभिनेता आदित्य राय कपूर यांच्यासह अन्य सेलिब्रिटी देखील होते.