गुलाबी चोळी-स्कर्टमध्ये मौनी रॉय दिसते गुलछबू (...

गुलाबी चोळी-स्कर्टमध्ये मौनी रॉय दिसते गुलछबू (Pretty In Pink : Mouni Roy Stuns In A Pink Dress)

मौनी रॉयचे ताजे फोटो चाहत्यांचे भान हरपणारे आहेत. कारण ती फारच छान दिसते आहे. मौनीने गुलाबी रंगाची चोळी आणि स्कर्ट घातला आहे. अन्‌ समुद्रकिनारी बसून ती सूर्यास्त न्याहाळते आहे. सोबत तिने अशी कॅप्शन दिली आहे की, तुम्ही स्वतःवर जसं प्रेम करता; तसंच जगावर करा.

या ड्रेसमध्ये मौनी रॉय अगदी ताज्या गुलाबासारखी दिसते आहे. आणि तिला चांगले कमेंटस्‌ मिळत आहेत. मौनीने स्लीव्हलेस स्ट्रॅपी चोळी घातली आहे आणि लांब स्कर्टशी तिची जोडी जमवली आहे. हा हलकासा गुलाबी रंगाचा ड्रेस तिला खूपच शोभून दिसतो आहे. तिचे बांधेसूद शरीर फारच हॉट आणि फिट दिसते आहे. कोणी तिला स्टनर म्हणतंय, तर कोणी हॉटी. तिचे सेलिब्रेटी मित्र पण कमेंट्‌स करत आहेत.

काही चाहत्यांनी मजेदार कमेंट्‌स दिले आहेत. ते म्हणतात की, करोना व्हायरस उंदीर आणि सापाला जखडत नाही. त्यामुळे तू सेफ आहेस. मौनीने ‘नागिन’ मालिकेत नागराणीची भूमिका केली असल्याने चाहत्यांची ही कमेंट आहे.

Photo Courtesy: Instagram (All Photos)

तुम्हीही बघा ना, मौनी या गुलाबी ड्रेसमध्ये अगदी गुलछबू दिसते आहे…