ऋषभ पंतच्या अपघाताची बातमी समजताच उर्वशी रौतेला...

ऋषभ पंतच्या अपघाताची बातमी समजताच उर्वशी रौतेलाने घातलं देवाकडे साकडं(Praying… #Love… Says Urvashi Rautela As She Shares Cryptic Post After Rishabh Pant’s Car Accident)

क्रिकेटपटू ऋषभ पंतचा आज सकाळी भीषण कार अपघात झाला. ऋषभची गाडी डिव्हायडरला धडकल्याने जळून खाक झाली, मात्र खिडकीची काच फोडून ऋषभ बाहेर पडण्यात यशस्वी झाला. अपघाचामुळे त्याला जबर दुखापत झाली असली तरी तो धोक्याबाहेर आहे.

ऋषभच्या अपघाताची बातमी आल्यानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेलाने एक गूढ पोस्ट शेअर केली, त्यामुळे ती नेहमीप्रमाणे ट्रोल होऊ लागली. उर्वशीने पांढऱ्या रंगाच्या हेवी ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले – प्रेइंग यानी प्रार्थना…  याच्या पुढे तिने पांढऱ्या रंगाचा हार्ट इमोजी आणि पांढरा कबूतराचा इमोजी शेअर केला आहे… हॅशटॅगमध्ये तिने ल्वह लिहिले आहे… आणि पुढे आपले नाव टाकले आहे.

अभिनेत्रीने कोणाचेही नाव लिहिलेले नाही पण ती पोस्ट फक्त ऋषभसाठी असल्याचा दावा चाहते करत आहेत. लोकांनी तिला या पोस्टमुळे ट्रोल करायला सुरुवात केली असून, चाहत्यांनी लिहिले –इतका मेकअप करून कोण प्रार्थना करते, एकाने कमेंट केली – भाभीजी पोस्ट शेअर करून काहीही होणार नाही, हॉर्लिक्स आणि सफरचंद घेऊन हॉस्पिटलला जा… आणखी एकाने कमेंट केली – तिथे भाऊ हॉस्पिटलमध्ये आहे आणि इथे वहिनी नागिनची पोस्ट शेअर करत आहे. उर्वशीने एकदम ग्लॅमरस फोटो शेअर आहे. फोटोत तिने डिमांड टिक्का, गळ्यात हार… केसात मुकुटासारखा जड दागिना घातला जातो.

उर्वशीचे नाव ऋषभशी जोडले गेले होते. त्यानंतर उर्वशीची एक मुलाखतही व्हायरल झाली ज्यामध्ये तिने ऋषभला फोन केला व त्यात भेटीगाठी आणि फोन कॉल्सबद्दल बरेच काही सांगितले. यानंतर ऋषभ आणि उर्वशीमध्ये सोशल मीडियावर युद्ध सुरू झाले. ऋषभने लिहिले होते – आता तरी माझं पाठलागं करणं सोड माझी बहिण….खोटं बोलण्याचीही मर्यादा असते, त्यानंतर अभिनेत्रीने छोटू भैया बॅट-बॉल से खेलो… अशी पोस्टही केली होती.

विश्वचषकादरम्यानही उर्वशी ऑस्ट्रेलियाला गेली होती आणि तिथूनही तिने अनेक गूढ पोस्ट शेअर केल्या होत्या. तिच्या पोस्टवर चाहते तिची मजा घेत तिला भाभीजी म्हणत होते.