प्रतीक बब्बरने आपल्या हृदयावर कोरले, आई स्मिता ...

प्रतीक बब्बरने आपल्या हृदयावर कोरले, आई स्मिता पाटीलचे नाव (Prateik Babbar Gets Mother Smita Patil’s Name Inked On His Heart)

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील व राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक ‘एक दिवाना था’ आणि ‘छिछोरे’ या चित्रपटातून दिसला होता. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. त्याने आपली आई स्मिता पाटील हिच्याबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी असे फोटो शेअर केले आहेत की, चाहते त्याची तारीफ करत आहेत.

प्रतीक आपल्या आईबाबत भावुक संदेश अधूनमधून लिहीत असतो. लहान वयातच आई गमावल्याचं दुःख त्याच्या संदेशांतून व्यक्त होत असतं. आता त्याने असं काही प्रसिद्ध केलं आहे की, आई सदैव त्याच्या हृदयापाशी राहील.

हृदयावर कोरलं आईचं नाव

होय, प्रतीकने आपल्या छातीवर, हृदयाच्या जागी स्मिताच्या नावाचा टॅटू कोरला आहे. आणि त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केला आहे. सोबत अतिशय भावनोत्कट संदेश लिहिला आहे. ” मी हृदयावर आईचं नाव कोरलं आहे… स्मिाता फॉरएव्हर १९५५ म्हणजे सदैव स्मिता… १९५५ ते अनंतापर्यंत…”

आता आई सतत माझ्याजवळ असेल

याबाबत एका मुलाखतीत तो म्हणतो, ” आईच्या नावाचा टॅटू काढावा, असं माझ्या मनात कधीपासून होतं. जिथे असायला हवं, तिथेच मी आईचं नाव कोरलं आहे. माझ्या हृदयावर. १९५५ हे तिचं जन्मसाल आहे. आता मी सतत माझ्याजवळ असेल.”

चाहत्यांसह मान्यवर प्रेम व्यक्त करत आहेत

प्रतीकच्या या पोस्टवर चाहत्यांसह काही मान्यवरांचे त्याने लक्ष वेधून घेतलं आहे. आर्य बब्बर, श्वेता साळवे आणि मृणाल ठाकूर अशा मान्यवरांनी प्रतीकच्या कृतीची प्रशंसा केली आहे. आणि ते लोक हार्ट आणि इमोजी यांच्या प्रतिमा टाकून त्याच्यावर लोभ दाखवत आहेत.

आईला प्रतीक नेहमीच मिस करतोय्‌

गुणशाली अभिनेत्री स्मिता पाटीलने दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला होता. प्रतीकला जन्म देऊन काही आठवड्यातच पोस्ट डिलिव्हरी कॉम्लिकेशन्स झाल्याने तिचा मृत्यू ओढवला होता. तिची उणीव प्रतीकला सदैव भासते. म्हणून तो सोशल मीडियावर तिची स्मृती जागवत असतो.

तिची परफेक्ट इमेज बनविण्याचा प्रयत्न करतोय्‌…

गेल्या वर्षी तिच्या पुण्यतिथीला स्मिताला श्रद्धांजली अर्पण करून प्रतीकने तिला परफेक्ट रोल मॉडेल म्हटले होते, ”गेल्या कित्येक वर्षापासून मी माझ्या मनात तिची परफेक्ट इमेज बनविण्याचा प्रयत्न करतोय्‌…”

आई परफेक्ट वूमन आहे…

प्रतीकने पुढे लिहिलं आहे, ”द परफेक्ट वूमन… परफेक्ट रोल मॉडेल… एक परफेक्ट आई, जिला प्रत्येक मुलगा आपलं रोल मॉडेल समजतो. आणि तिच्यासारखा बनू इच्छितो… दरवर्षी ती तरुण होते आहे… माझ्यासोबत ती आता ६५ वर्षांची झाली आहे… ती माझ्यासोबत जगते आहे…” प्रतीकचे हे नाते चाहत्यांना नेहमीच आवडते आहे.

प्रतीकच्या कामाबद्दल बोलायचं तर तो ‘मुंबई सागा’ मध्ये दिसला होता. ‘बच्चन पांडे’ हा त्याचा आगामी चित्रपट आहे. ज्यामध्ये तो अक्षयकुमार सोबत आहे. शिवाय मधुर भांडारकरच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ मध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल.