अभिनेत्री नूतनच्या नातीने, प्रनूतन हिने केला ति...

अभिनेत्री नूतनच्या नातीने, प्रनूतन हिने केला तिच्या हिट गाण्यावर डान्स ( Pranutan Dances To Grand Maa Nutan’s Hit Song )

Pranutan Dances

मोहनीश बहलची मुलगी आणि अभिनेत्री नूतन हिची नात प्रनूतन बॉलीवूड मध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करते आहे. अद्याप तिचं करिअर खूप काही मार्गी लागलेलं नाही. परंतु आपली आजी नूतन हिच्यासारखीच ती दिसायला खूप सुंदर आहे.

Pranutan Dances

प्रनुतन सोसिअल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे अन या मंचावर ती आपले फोटो, विडिओ शेअर करत असते. पण आता तिने जी पोस्ट टाकली आहे, ती पाहून युसर्स म्हणतोय कि प्रनूतनने हा मंच उजळून टाकला आहे. ‘मोरा गोरा अंग लेह ले’ या आपली आजी नूतन हिच्यावर चित्रित झालेल्या गाण्यावर प्रनूतनने डान्स केलेला विडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तो इतका छान आहे कि, प्रनुतनचे नृत्य आणि अभिनय पाहून नूतनची आठवण आल्यावाचून राहणार नाही. या सोबत ती लिहिते ” माझ्या आजीचं हे गाणं आहे. त्यामुळे मला ते खूप विशेष आहे ”.

Pranutan Dances


१९६३ साली प्रदर्शित झालेला ‘बंदिनी’ या चित्रपटातील हे लोकप्रिय गाणे आहे. लता मंगेशकर हिने गायलेले हे गाणे आजही रसिकांच्या तोंडी आहे. अन त्यावर प्रणुतूनने केलेला डान्स, युजर्सचे मनोरंजन करतो आहे.

Pranutan Dances

प्रनुतनला सलमान खानने आपल्या चित्रपटातून संधी दिली होती. ‘नोटबुक’ हा तिचा चित्रपट फार चालला न्हवता, पण तिच्या अभिनयाची तारीफ झाली होती. आता तिचा ‘हेल्मेट’ हा नवा चित्रपट येईल. त्यामध्ये बोल्ड विषय हाताळन्यात आलेल्या असल्याने तो चर्चेत आहे.

Pranutan Dances