प्राजक्ता माळीचे नवीन क्षेत्रात पदार्पण(Prajakt...

प्राजक्ता माळीचे नवीन क्षेत्रात पदार्पण(Prajakta Mali’s debut in a new field)

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तिथे ती अनेकदा आपले सुंदर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओंना चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. चित्रपट आणि मालिकांमधील अभिनयाने देखील चाहत्यांची मने जिंकून घेतली आहे.

प्राजक्ताच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे प्राजक्ताने नवीन क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिने नवीन क्षेत्रात पदार्पण केले म्हणजे तिने अभिनय सोडला असे नाही. तिने स्वत:चा ब्रॅण्ड लॉन्च केला आहे. गेले काही दिवस ती आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून तिच्या फॅन्सला काहीतरी नवीन होणार असल्याचे सांगत होती. ती रोज एक पोस्ट करत नवीन काहीतरी होणार याबद्दल फॅन्सला आठवण करून देत होती. तिच्या पोस्टमुळे साहजिकच तिचे फॅन्स देखील आतुर झाले होते.

काहीजणांनी तर लवकरच ती लग्न करणार असल्याचा अंदाज बांधला होता. पण आता मात्र तिने चाहत्यांना एक सुंदर सरप्राइज दिले आहे.प्राजक्ताने सोशल मीडियावर लाईव्ह येत एक नवीन व्यवसाय सुरु करत असल्याचे जाहीर केले. तिने ‘प्राजक्तराज’ नावाचा एक ज्वेलरी ब्रँड लाँच केला आहे. या ज्वेलरी ब्रँडचे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच मुंबईमध्ये संपन्न झाले. याचा एक शानदार सोहळा प्राजक्ताने आयोजित केला होता. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची पत्नी असलेल्या शर्मिला ठाकरे देखील या सोहळ्याला उपस्थित होत्या.

प्राजक्ताने सुरु केलेल्या तिच्या ‘प्राजक्तराज’मध्ये महाराष्ट्रातील लोप पावत असणारे सर्व दागिने ग्राहकांना मिळणार आहे. महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने ‘प्राजक्तराज’मध्ये उपलब्ध असणार आहे. सर्व जुन्या पारंपरिक लोप पावणाऱ्या दागिन्यांची ती महिलांना नव्याने ओळख करून देणार आहे.

प्राजक्ताने तिच्या दागिन्यांमध्ये सरा, बुगडी, शिंदेशाही तोडे, पैलू पाटली, मासोळ्या, बेलपान, बकुळीहार, पुतळीहार, साज, ठुशी, नथ, मोहनमाळ, चंद्रहार यासारखे सर्वच दागिने मिळणार आहेत. प्राजक्ताच्या ज्वेलरी ब्रँडमध्ये मिळणारे दागिने खरे नसून ते ऑथेंटिक असणार आहेत. राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या भाषणामध्ये प्राजक्ताचे कौतुक केले. तिने महाराष्ट्राची लोप पावत जाणाऱ्या संस्कृतीला वाचवण्यासाठी जो प्रयत्न केला आहे तो कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

सध्या या उदघाटनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.