प्रभासला करायचा होता व्यवसाय, पण नशिबाने बनवलं ...

प्रभासला करायचा होता व्यवसाय, पण नशिबाने बनवलं अभिनेता (Prabhas Wanted To Do This Business, Not Acting)

साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार प्रभासचे पूर्ण नाव क्वचितच कुणाला माहीत असेल. त्याचे खरे नाव उप्पलपती वेंकट सूर्यनारायण प्रभास राजू असे आहे.  प्रभास हैदराबादमध्ये राहतो, परंतु त्याचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता. 23 ऑक्टोबर 1979 रोजी जन्मलेल्या प्रभासचे वडील एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता होते, त्यांचे नाव उप्पलपती सूर्यनारायण राजू असे होते. प्रभासने हैदराबादच्या नालंदा कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर त्याने विशाखापट्टणम येथील सत्यानंद फिल्म स्टुडिओमधूनही शिक्षण घेतले आहे.

प्रभासला खाण्यापिण्याची खूप आवड आहे. चित्रपटात येण्यापूर्वी त्याला स्वतःचे हॉटेल उघडायचे होते, पण चित्रपटात काम करायला सुरुवात केल्यामुळे त्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. प्रभासने 2002 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ‘ईश्वर’ हा त्याचा पहिला चित्रपट होता.

पुढे त्याने बाहुबली सीरिजच्या दोन्ही चित्रपटांसह एकूण 20 चित्रपटांत काम केले. चित्रपटांव्यतिरिक्त प्रभास सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. अनेकदा तो सोशल मीडियावर आपले व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याची पोस्ट चाहत्यांना खूप आवडते.

प्रभासच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो प्रभू रामाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनन आणि सैफ अली खान देखील दिसणार आहेत. याशिवाय तो ‘सालार’ या चित्रपटातही दिसणार आहे.

सध्या प्रभास आणखी एका बातमीमुळे खूप चर्चेत आहे. ते म्हणजे तो बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननला डेट करत असल्याची चर्चा होत आहे. करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण’मुळे त्यांच्या डेटींगच्या बातम्या सुरू झाल्या आहेत. या शोच्या कॉलिंग सेगमेंटमध्ये क्रितीने प्रभासला कॉल केला होता. तेव्हापासून दोघांमध्ये काहीतरी सुरु असून दोघं एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम