लालभडक साडीमध्ये लाजरीबुजरी नववधू, असे लग्नानंत...
लालभडक साडीमध्ये लाजरीबुजरी नववधू, असे लग्नानंतरचे मोहक फोटो मौनी रॉयने शेअर केलेत (Post Wedding Pictures: Mouni Roy Flaunts Her New Pictures In Beautiful Red Saree)

By Deepak Khedekar in मनोरंजन
आतापर्यंत मौनी रॉयने आपल्या लग्नाचे अप्रकाशित फोटो प्रसिद्ध केले होते. तर आता तिने लग्नानंतरचे आपले नवे फोटो दिले आहेत. त्यामध्ये ती लाजरीबुजरी नववधू दिसते आहे.



गोव्यामध्ये मौनी रॉय, सुरज नंबियारसोबत बोहल्यावर चढली. आता तिचे मोहक रूप समोर आले आहे. त्यामध्ये ती लालगडद बनारसी साडी नेसली आहे. तर गळ्यामध्ये नौलखा हार, कानात झुमके आणि भांगेत सिंदूर घातलेला दिसतो आहे.


मौनीचे हात मेंदीने रंगले आहेत. काजळ घातलेले टपोरे डोळे खाली झुकले आहेत. इतर छायाचित्रात तिने केस मोकळे सोडले आहेत आणि वेगवेगळ्या पोझेस दिल्या आहेत. नवऱ्याबरोबरचे सुद्धा फोटो त्यात आहेत. लालभडक साडीमध्ये मौनीचे रूप खूपच खुलून आले आहे.