सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे पिरॅमिड…(Positiv...

सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे पिरॅमिड…(Positive Energy Generating Pyramids)

मी हल्लीच आमच्या गावी एक नवीन प्लॉट विकत घेतला आहे. पण आता माझ्या लक्षात असे आले आहे की ह्या प्लॉटला वायव्य दिशेचा कोपराच नाही आहे. अशा प्लॉटचा काय परिणाम असतो जरा सांगाल का?

 • संयोगिता, पनवेल
  ज्या जमिनीला एखादा कोपराच नसेल तर असा प्लॉट हा कधीच लाभदायक ठरत नाही. वायव्य कोपरा नसलेला प्लॉट खरेदी केल्यास चोरीपासून भय संभवते. अकारण वादविवाद, तंटे, कोर्टकचेरीची प्रकरणे मागे लागतात. आम्ही गावी घर बांधत आहोत. आमच्या जागेत विहीर नाही म्हणून बोअरिंग पाडण्याचा विचार करत आहोत. परंतु, पाण्याची टाकी किंवा बोअरिंग कुठे असावी हे माहीत नाही. कृपया याबाबतीत मार्गदर्शन करावे ही विनंती.
 • प्राजक्ता, सोलापूर
  जिथे विहीर नाही आणि पर्याय म्हणून बोअरिंगची व्यवस्था करायची असेल, पाण्याची टाकी बसवायची असेल तर त्यासाठी पूर्व अथवा ईशान्य दिशा अत्यंत योग्य ठरते. आग्नेय दिशेला अशी व्यवस्था असू नये. पश्चिम, दक्षिण, नैऋत्य दिशेला जर पाण्याची टाकी असेल तर त्याचा विपरीत परिणाम राहणार्‍या व्यक्तींच्या आरोग्यावर होतो. टाकी जमिनीवर बसवायची असेल तर वायव्य किंवा उत्तर दिशा निवडावी.
  माझ्या वाढदिवसाला माझ्या मैत्रिणीने मला तीन पायांचा बेडूक भेट दिला आहे. वास्तुशास्त्रात ह्या बेडकाला खूप महत्त्व आहे, असे ती मला म्हणाली. हा बेडूक कुठे व कसा ठेवायचा? आणि त्याचे काय लाभ आहेत, ते सांगाल का?
 • मनीषा, पालघर
  तुमच्या घराच्या हॉलमध्ये तुम्ही तीन पायांचा बेडूक दरवाजाकडे पाठ व आतील बाजूस तोंड करून ठेवा. त्याच्या तोंडात एक कॉइन असतं. त्या कॉइनचे चार सिंबॉल असलेले चित्र वरच्या बाजूस ठेवा. हा आपल्या घरात पैसा खेचून घेऊन येतो. धन, आरोग्य, दीर्घायुष्य, संपन्नता, चांगले भविष्य यांना आमंत्रित करतो.
  ’पिरॅमिड’ म्हणजे काय?
 • स्वप्नाली, रत्नागिरी
  ’पिरा‘ म्हणजे अग्नी व ’मिड‘ म्हणजे मध्ये. ’पिरॅमिड‘ म्हणजे मध्यभागी अग्नी अर्थात् ऊर्जाशक्ती असलेले जनरेटर होय. पिरॅमिड हे धन ऊर्जा निर्माण करणारे यंत्र आहे. नकारात्मक ऊर्जाभागांमध्ये पिरॅमिड ठेवल्यास तेथील ऊर्जा सकारात्मक होते. पिरॅमिडच्या विशिष्ट आकारामुळे त्यात ठेवलेली कुठलीही वस्तू अनंत काळासाठी जशीच्या तशीच राहते. अनेक रोगांच्या उपचार पद्धतीमध्ये सुद्धा पिरॅमिडचा वापर केला जातो.