पोज, मेकअप, शॉपिंग म्हणत करीना कपूरने लंडन येथू...

पोज, मेकअप, शॉपिंग म्हणत करीना कपूरने लंडन येथून बहीण करिश्मा कपूरसोबतचे शेअर केले फोटो (Pose, Makeup, Shopping, Repeat… Kareena Kapoor Shares Beautiful Pics With Karisma Kapoor From London, Reveals What Kapoor Sisters Do When They Meet)

अभिनेत्री करीना कपूर खान सध्या लंडनमध्ये हंसल मेहताच्या क्राइम थ्रिलरचे शूटिंग करत आहे. आपले लंडनमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करून ती आपले अपडेट त्यांना देत आहे. बेबोने आपल्या इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले असून या फोटोंमध्ये ती आपली बहीण करिश्मा कपूरसोबत मस्ती करताना दिसत आहे.

करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर या केवळ बहिणीच नाहीत तर एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी देखील आहेत. करीना आणि करिश्मा अनेकदा एकमेकांसोबत मस्ती करताना दिसतात. त्यामुळे आता करिश्मा देखील करीना कपूरला भेटण्यासाठी वेळ काढून लंडनला पोहोचली आहे. तसेच कामातून सवड मिळताच कपूर बहिणी मिळालेला वेळ मजेत घालवण्यासाठी लंडन भ्रमंती करत आहेत.

त्याच संदर्भातील काही फोटो करीनाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.करीनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोन्ही बहिणी एकत्र मस्ती करताना दिसत आहेत. फोटोमध्ये, करीना संपूर्ण काळ्या रंगाच्या ड्रेस घातला आहे, तर करिश्मा देखील काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा दोन बहिणी भेटतात तेव्हा त्या काय करतात? पोज, मेकअप, शॉपिंग, रिपीट. हीच तर मुलींची मजा आहे.”

शेअर केलेला पहिला फोटो मिरर सेल्फी आहे, ज्यामध्ये कपूर बहिणी अॅनिमल प्रिंट जॅकेट, पँट आणि उंच बुटात सुंदर दिसत आहेत.

दुस-या फोटोत दोघीही वॉशरूममध्ये मेकअप करताना दिसत आहेत, तिसर्‍या फोटोत दोघी खरेदी करत आहेत आणि चौथ्या फोटोत दोघीही हिवाळ्याची मजा घेत आहेत. कपूर बहिणींच्या या मजेदार फोटोंवर त्यांचे चाहते लाईक- कमेंट करत आहेत आणि दोघांच्या बाँडिंगचे कौतुक करत आहेत.

त्याचबरोबर चाहत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटीही त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.याआधी करीनाने आपला लहान मुलगा जेहसोबत वेळ घालवतानाचे काही सुंदर फोटो शेअर केले होते. या छायाचित्रांनाही चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले होते.करीना कपूर खान सध्या लंडनमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट एक ‘मर्डर मिस्ट्री’ आहे ज्यामध्ये बेबो एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे.