उत्तान आणि अंगप्रदर्शक ब्रालेट व साडीमध्ये भूमी...

उत्तान आणि अंगप्रदर्शक ब्रालेट व साडीमध्ये भूमी पेडणेकरला पाहून ट्रोलर्सचा थयथयाट म्हणाले, अत्यंत असभ्य(‘Porn industry try kro’: Users slam Bhumi Pednekar for her look in a revealing bralette blouse and Saree, call it ‘Nihayati Behooda’)

भूमी पेडणेकर सध्या आपल्या आगामी ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. याशिवाय अभिनेत्री आपल्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस लूकमुळेही अनेकदा चर्चेत असते. अभिनेत्री अनेकदा आपले सुंदर फोटो शेअर करत असते, मात्र यावेळी भूमीने साडी आणि ब्रालेटमधील फोटो शेअर केल्याने ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

भूमीच्या अगदी जवळच्या मित्राचे लग्न होते त्यासाठी ती तयार झाली होती, त्यावेळचे काही फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. निळ्या रंगाची साडी परिधान केलेली भूमी या फोटोंमध्ये अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसली. भूमीने भारतीय पोशाख घातला असला तरी तिचा लूक खूपच बोल्ड असल्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली.

भूमी पेडणेकरने निळ्या रंगाच्या साडीसोबत अतिशय अंगप्रदर्शन करणारा ब्लाउज पेअर केला होता. साडीपेक्षाही भूमी पेडणेकरच्या अनोख्या ब्लाउज डिझाइनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अभिनेत्रीने लाल फुलांचा नक्षीदार ब्रालेट ब्लाउज घातला होता.

या सेक्सी ब्लाउजचे प्रदर्शन करण्यासाठी भूमीने खास पद्धतीने साडी नेसलेली. या लूकमध्ये भूमी पेडणेकर खूपच हॉट दिसत होती, मात्र सोशल मीडिया युजर्सना तिची स्टाइल आवडली नाही.

अनेक युजर्सनी भूमीला व्यवस्थित कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे. एका यूजरने ‘पोर्न इंडस्ट्रीत वापरून पाहा, भरपूर वाव आहे’ असे लिहिले आहे, तर दुसऱ्या यूजरने हे अत्यंत हास्यास्पद असल्याचे म्हटले. अनेकांनी भूमीची तुलना उर्फीशीही केली आहे.

काहींना मात्र भूमीचा हा स्टनिंग लूक खूप आवडला आहे. ते तशा प्रतिक्रियाही देत आहेत. मात्र बहुतांश लोकांनी भूमीच्या फोटोंवर नाराजी व्यक्त केली आहे.