‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता कार...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता कार्टून स्वरूपात (Popular TV Comedy Show ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’ Is Coming Soon As Cartoon)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या बेहद लोकप्रिय असलेल्या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून ही मालिका कार्टून कॅरेक्टर्सच्या स्वरूपात प्रदर्शित होणार आहे. गेल्या १२ वर्षापासून ही मालिका प्रेक्षकांना हसवित आहे. कुटुंबातील सर्व जणांना ती आवडते. आता त्याच्या पात्रांचे ॲनिमेशन करण्यात आले असून कार्टून फिल्मसारखी ती दिसेल.

व्हिडिओ सौजन्य : वीरल भयानी
सोनी सब टीव्ही चॅनल वरून एप्रिल महिन्यापासून ही ॲनिमेटेड मालिका प्रदर्शित होईल. जेठालाल, दयाबेन, टप्पू, बापूजी ॲन्ड कंपनी यांची विनोदी आविर्भावातील हलती चित्रे आता पाहायला मिळतील. चॅनलने या कार्यक्रमाचे व्हिडिओज्‌ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सोनी सब चॅनलवर प्रसारित होणारा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम आहे. जुलै २००८ मध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

गोकुळधाम सोसायटीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांच्या भोवती हा कार्यक्रम फिरतो. वेगवेगळ्या जातीधर्माचे हे लोक एकजुटीने राहतात. अन्‌ दररोज येणाऱ्या विवंचनांना हसतमुखाने सामोरे जातात. दिशा वकानी, दिलीप जोशी, शैलेश लोढा, मुनमुन दत्ता यांचा अभिनय लोकांना खूप आवडतो.


चाळीशी गाठलेल्या श्वेता तिवारीने दाखवला जवानीचा जलवा