‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर येणा...

‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर येणार लोकप्रिय पार्श्र्वगायक उदित नारायण! (Popular playback singer Udit Narayan to appear on ‘Indian Idol Marathi’)

इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमातल्या प्रत्येक स्पर्धकाने पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस स्पर्धा रंगात चालली असून लवकरच पहिल्या पर्वाचा विजेता मिळणार आहे. महाराष्ट्राला टॉप ७ स्पर्धक मिळाले असून अंतिम फेरीसाठी आता सुरांची स्पर्धा बघायला मिळेल. यंदाचा आठवडा स्पर्धकांसाठी, प्रेक्षकांसाठी खास असणार आहे कारण हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक लोकप्रिय पार्श्वगायक उदित नारायण सुरांच्या मंचावर येणार आहेत.

गायक उदित नारायण यांनी अनेक हिंदी चित्रपटांतील गाण्यांना आवाज दिला आहे. सुरांच्या मंचावर उदितजी यांनी खास रसिकांसाठी त्यांची काही लोकप्रिय गाणी सादर केली आणि मंच सुरमय होऊन गेला. उदितजी यांनी अजय – अतूल यांच्यासोबत सुद्धा काम केलं असल्याने, किस्से, आठवणी या सगळ्यामुळे भाग चांगलाच रंगला. तेव्हा ‘इंडियन आयडल मराठी’ च्या आगामी भागात सुरांच्या मंचावर सुरांसोबत आठवणींचा पेटाराही उघडला जाणार आहे.