मोटू-पतलूच्या १० व्या वाढदिवसानिमित्त १००० पेक्...

मोटू-पतलूच्या १० व्या वाढदिवसानिमित्त १००० पेक्षा जास्त समोशांचा पिरॅमिड (Popular Cartoon Characters Motu-Patlu Celebrated Their 10th Birthday With Kids By Creating A Pyramid Of 1000 Plus Samosas)

दशकभरात, मोटू पतलू हा भारतातील समस्त बालदोस्तांच्या पसंतीचा मनोरंजनपर कार्यक्रम ठरला आहे. त्या दोन्ही व्यक्तिरेखांनी प्रत्येक घरातील हृदये आणि स्क्रीनवर आपला ठसा उमटविला आहे. लोटपोट कॉमिक्समधील गाजलेल्या मोटू-पतलू या व्यक्तिरेखा म्हणजे निकलोडियनची सुप्रसिद्ध टून-द्वयी मानली जाते. भारतामधील या पहिल्या-वहिल्या अॅनिमेटेड व्यक्तिरेखा आहेत, ज्यांचे पुतळे थेट मॅडम तुसाद संग्रहालयात ठेवण्यात आले. या दोन्ही व्यक्तिरेखांची लोकप्रियता वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल. आजच्या तारखेत मोटू-पतलू यांच्या विनोदाचे किस्से बच्चेकंपनीला खळखळून हसायला तर लावतात, शिवाय ओटीटी मंचांवर त्यांचे थरारक साहस उपलब्ध आहे, गेम आणि विविध ग्राहक उत्पादनांच्या माध्यमांतून ही कार्टून पाहता येतात.

अग्रगण्य बाल मनोरंजन शाखा – निकलोडियनची लोकप्रिय टून-द्वयी भारतीय घरांत सर्वांच्या पसंतीची मानली जात असल्याने मोटू-पतलूच्या 10 व्या वाढदिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या, भारतातील सर्वात विश्वासार्ह एनजीओ, स्माईल फाऊंडेशन’च्या साथीने या दोन कार्टून व्यक्तिरेखांचा खास दिवस साजरा करण्यात आला. 

वाढदिवसाची ही धम्माल फारच खास होती, त्यात मजामस्ती आणि खेळ होते. जणू काही मोटू-पतलू थेट टीव्ही स्क्रीनमधून बाहेर येऊन छोट्या दोस्तांमध्ये गुंतले. त्यांनी त्यांच्यासोबत वेडपटपणा केला, भरपूर सेल्फी काढले. लहान मुलांनी आवडत्या मोटू-पतलू सोबत टायटल ट्रॅकवर नाच केला. यावेळी अनेकांनी आपले कलागुण सादर केले. हा दिवस प्रत्येकाकरिता अतिशय खास होता.

मोटू-पतलू’च्या आवडीच्या समोशांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली! हा या टून-द्वयींचा 10 वा वाढदिवस असल्याने धमाल एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली होती! यावेळी 1000 पेक्षा अधिक समोशांनी तयार करण्यात आलेला पिरॅमिड आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तसेच बाल दोस्तांनी स्वयंसेवकांसमवेत केकचा मनमुराद आस्वाद घेतला.