पूनम पांडेने निंदकांना फैलावर घेतले : म्हणते, “...

पूनम पांडेने निंदकांना फैलावर घेतले : म्हणते, “हे लोक रात्री माझा व्हिडिओ पाहतात, अन् सकाळी मला बेशरम ठरवतात…” (Poonam Pandey Slams Haters : Says, “They Watch My Videos At Night And Troll In The Morning.”)

‘लॉक अप’ या नव्या रिॲलिटी शो ची सर्वाधिक विवादास्पद स्पर्धक आहे पूनम पांडे. नेहमीच बोल्ड आणि वादग्रस्त विधाने करण्यात पटाईत असलेली पूनम आपल्या खासगी जीवनाबद्दल नवनव्या गोष्टी उलगडत राहिल्याने चर्चेत आहे. आता तिने आपली निंदा करणाऱ्यांना फैलावर घेतले आहे. अंगप्रदर्शन करण्यावरून जे लोक तिला नावे ठेवतात, त्यांच्यावर तिचा रोख आहे.

स्पर्धकांशी बातचीत करताना ती सांगते, “मी आपल्या शरीराचं प्रदर्शन करते, कपडे काढते म्हणून मला बेशरम म्हणत असाल, तर ते मला मान्य नाही. जे लोक दुसऱ्यांची लाज काढतात, त्यांना वाईट म्हणतात, ते स्वतःच बेशरम असतात.”

अलिकडच्या एका एपिसोडमध्ये आपल्या लॉक अप मधील सोबती अंजली अरोरा व तहसीन पूनावाला यांच्याशी पूनम चर्चा करत होती. तिनं बिनधास्तपणे आपल्या खासगी जीवनातील पाने उलगडून दाखवली.

तहसीनने पूनमला पाठिंबा दाखवत म्हटलं की, लोक पूनमचा व्हिडिओ बघतात. अन्‌ तिच्याबद्दल वाईटसाईट बोलतात. त्यावर पूनम उत्तरली, “ ६० मिलियन इंप्रेशंस, २०० मिलियन एका महिन्यात उगाच मिळत नाहीत ना! हेच लोक रात्री माझा व्हिडिओ बघतात. अन्‌ सकाळी उठून मला ट्रोल करतात. माझ्याविरुद्ध बोलतात. आता मला सांगा, बेशरम कोण आहे? मी की ते?’’

पूनम पुढे म्हणाली, ‘‘५ बायकांचा एक ग्रूप आहे. जो एका मुलीबाबत गॉसिप करतो. त्यांना माझी काळजी वाटते, मी लग्न करणार की नाही. मी कसे कपडे घालते. मी मुलाला जन्म देणार की नाही. त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की, ती माझी जबाबदारी आहे. आपलं जीवन कसं सांभाळायचं ते मला बरोबर कळतं. मी काय करावं, हे सांगण्याचा त्यांना काहीच अधिकार नाही.’’

एरव्ही कितीही टीका झाली तरी आपल्या खासगी आयुष्याबद्दल मौन बाळगणाऱ्या पूनम पांडेने आता तोंड उघडलं आहे. आपल्या वैवाहिक जीवनातील त्रासाबद्दल सांगताना ती म्हणाली की, ‘‘नवरा सॅम दारूच्या नशेत खूप मारायचा. त्यामुळे तिला ब्रेन हॅमरेज झाला होता. आपल्याच घरात मला मोबाईलला हात लावण्याची परवानगी नव्हती. आता पूनम सॅमपासून अलग झालेली आहे. मारहाणीच्या आरोपावरून तिने सॅमला तुरुंगात धाडले आहे.’’