सीट बेल्ट लावण्याच्या नव्या नियमांवर पूजा भट्टन...

सीट बेल्ट लावण्याच्या नव्या नियमांवर पूजा भट्टने दिली खोचक प्रतिक्रीया, म्हणाली आधी खड्डे आणि खराब रस्ते दुरुस्त करा (Pooja Bhatt reacts on new laws for seatbelts, says fixing potholes is more important than talking about seatbelt)

काही दिवसांपूर्वीच टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला. जर त्यांनी सीट बेल्ट लावला असता तर त्यांचे प्राण वाचू शकले असते असे म्हटले जाऊ लागले. या आधीही केवळ सीट बेल्ट न लावल्यामुळे कित्येकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेत प्रत्येकाला सीट बेल्ट लावणे बंधनकारक केले आहे. आता मागच्या सीटवर बसलेल्या लोकांना सेल्ट बेल्ट लावणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांचे चलन कापले जाईल.

या नियमांवर आता अभिेनेत्री पूजा भट्टने खोचक प्रतिक्रीया दिली. तसे पाहायला गेले तर पूजा भट्ट नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यावर आपले मत मांडत असते. आता तिने या सीट बेल्ट संबंधीच्या नव्या नियमांवर आपले मत मांडले आहे.

पूजा भट्टने ट्विट करून लिहिले की, ‘सीट बेल्ट आणि एअर बॅगवर चर्चा होत आहे. ते अनिवार्य आहे का? आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे खड्डे आणि खराब रस्ते दुरुस्त करणे. रस्ते, महामार्ग, मोकळ्या रस्त्यांच्या बांधकामासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणाऱ्यांना गुन्हेगार म्हणून कधी मानणार ? याशिवाय जे रस्ते पूर्वी बांधले गेले आणि थाटात उद्घाटन झाले, त्यांची देखभाल करणेही गरजेचे आहे.

पूजा भट्टच्या या ट्विटवर लोकांच्या सतत प्रतिक्रिया येत आहेत. अनेक युजर्स पूजाला सपोर्ट करत आहेत. तर काही युजर्स पूजाला ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ‘सडक सारखा चित्रपट बनवला तर सगळे बघतात, पण जर तुम्ही ‘सडक छाप’ चित्रपट बनवला तर कोणी बघायला जात नाही.’ तर काही युजर्सनी पूजाच्या ट्विटशी आपली सहमतीही दर्शवली आहे.