पंतप्रधानांच्या महिला शक्तीचा बोलबाला ; अभिनेत्...

पंतप्रधानांच्या महिला शक्तीचा बोलबाला ; अभिनेत्रींनी केला नारी शक्तीला सलाम (PM Praises Women in ‘Man Ki Baat’, Actress Salutes Nari Shakti)

काल रविवारी आपले माननीय पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या, त्याने चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्री खूपच प्रभावित झाल्या. पंतप्रधानांनी स्त्री-शक्ती आणि विविध क्षेत्रात महिलांनी योगदान देऊन जी प्रगती साधली आहे, त्याबद्दल मनापासून प्रशंसा करून आपले विचार मांडले होते. ते सर्वसामान्यांच्या पचनी तर पडलेच पण बॉलिवूडमधील महिलांना देखील अतिशय आवडले आणि त्यांनी या महिला सशक्तीकरणास पाठिंबा देऊन, काही कर्तबगार, यशस्वी महिलांचे फोटो शेअर केले. त्यांचे आभार मानले. अभिनंदन केले आहे.

फोटोसौजन्य:इंस्टाग्राम

फोटोसौजन्य:इंस्टाग्राम

करिना कपूर म्हणते, ”कमर्शिअल फ्लाईटच्या यशस्वी उड्डाणापासून ते गणराज्य दिनाच्या संचलनामध्ये भाग घेण्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात कर्तबगार महिलांचे योगदान सतत वाढत आहे. आपल्या देशाची बेटी आज निडर, बहाद्दूर आहे. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आणि देश घडविण्यासाठी देशातील मुलींचे समान योगदान आहे.”

फोटोसौजन्य:इंस्टाग्राम

फोटोसौजन्य:इंस्टाग्राम

फोटोसौजन्य:इंस्टाग्राम

एकता कपूरने आपल्या पोस्टमध्ये त्यांना सॅल्युट करून विविध क्षेत्रात प्रगती करणाऱ्या महिलांची नावे आणि त्यांचे फोटो शेअर केले आहेत. तिने सर्वप्रथम सॅन फॅन्सिस्को ते बेंगलुरूपर्यंत पहिली नॉन-स्टॉप फ्लाईट चालविणाऱ्या कॅप्टन झोया अग्रवाल आणि त्यांच्या टीमची तारीफ केली आहे. नंतर भावना कंठ या एअर फोर्स पायलटने फायटर प्लेनने गणराज्य दिनी फ्लायपास्टची जी करामत केली, त्याबद्दल अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये भावनाचा आवर्जून उल्लेख केला होता. त्याचा धागा पकडून एकताने देशासाठी अद्‌भूत योगदान देणाऱ्या महिलांची तारीफ केली आहे व त्यांना सॅल्युट केला आहे. कोरोना महामारीच्या काळात स्वतःची तांदळाची गिरणी चालू करून स्वावलंबी झालेल्या मीनाच्या साहसाची तारीफ केली आहे.