पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे जबरदस्त चाहते आहेत ...

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे जबरदस्त चाहते आहेत बॉलिवूडचे हे कलाकार (PM Narendra Modi’s Birthday: Bollywood Celebs Biggest Fan Of PM Narendra Modi)

आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज त्यांचा ७२ वा जन्मदिवस साजरा करत आहेत. सोशल मिडियावरून जनता मोदीजींना मोठ्या प्रमाणावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. सामान्य जनते सोबतच, देशातील प्रसिद्ध व्यक्ती अन्‌ तर बॉलिवूडचे मोठमोठे कलाकारही मोदीजींचे जबरदस्त चाहते आहेत. सलमान खान, अक्षय कुमारपासून ते अनुपम खेर असे अनेक कलाकार बरेचदा मोदींसोबत वेळ घालवताना दिसले आहेत. पाहुया या चित्रपटसृष्टीतील कोणकोणते सेलिब्रेटी पंतप्रधानांचे फॅन आहेत.

अक्षय कुमार (Akshay Kumar)

या लिस्टमध्ये सगळ्यात आधी अभिनेता अक्षय कुमारचं नाव आहे. नरेंद्र मोदींची पहिली नॉन पॉलिटिकल मुलाखत घेतल्यानंतर अक्षय कुमार प्रसिद्धीच्या झोतात आला. पंतप्रधानांची ही मुलाखत मोठ्या प्रमाणात पाहण्यात आली होती. त्यानंतर अक्षय कुमारने सामाजिक विषयांवर आधारित अनेक चित्रपट केले. बरेचदा तो मोदींच्या निर्णयांचे समर्थन करताना दिसतो.

सलमान खान (Salman Khan)

बॉलिवूडचा दबंग म्हणजेच सलमान खान देखील नरेंद्र मोदींचा मोठा चाहता आहे. तो अनेकदा पंतप्रधानांना भेटताना दिसतो. सलमानला मोदीजींचा कट्टर समर्थक असे म्हटले जाते. सलमान सोबत मोदीजींनी पंतग उडवली, त्यावेळी बरीच चर्चा रंगली होती. दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले आहेत.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)

गुजरातच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी अमिताभ बच्चन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांची भेट घेतली. दोघांच्या या भेटीची बरीच चर्चा झाली होती.

कंगना राणौत (Kangana Ranaut)

अभिनेत्री कंगना राणौत ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी फॅन आहे. ती ट्विटर ते प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधानांना फॉलो करते. सीएए, एनआरसी आणि किसान विधेयक यांसारख्या मुद्द्यांवरही कंगना पंतप्रधान मोदींना पाठिंबा देताना दिसली आहे. तसेच मोदीजींना विरोध करणाऱ्यांवर ती तिचे टीकास्त्र सोडत असते.

लता मंगेशकर (Lata Mangeshkar)

या यादीत प्रसिद्ध गायिका स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाचाही समावेश आहे. त्या मोदींना भाऊ म्हणायच्या आणि ट्विटर अकाऊंटवरून पंतप्रधानांच्या निर्णयांचे समर्थन करायच्या.

सनी देओल (Sunny Deol)

2019 मध्ये सनी देओलने भाजपच्या तिकिटावर पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी ही निवडणूक जिंकली होती. सनी देओल अनेकदा पंतप्रधान मोदींना भेटत असतो. तो सतत पंतप्रधानांचे कौतुक करताना दिसतो.

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)

अभिनेत्री प्रियंका चोप्रा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी फॅन आहे. तिने स्वतः ही गोष्ट मान्य केली आहे. इतकंच नाही तर प्रियंका आणि निकच्या रिसेप्शन पार्टीला नरेंद्र मोदींनी हजेरी लावली होती.

अनुपम खेर (Anupam Kher)

अभिनेता अनुपम खेर हे पीएम मोदींचे मोठे समर्थक आहेत, ही गोष्ट कोणापासून लपून राहिलेली नाही. ते अनेकदा मोदींना भेटतात. इतकेच नाही तर अनुपम खेर अनेकदा सोशल मीडियावर पीएम मोदींच्या योजनांचे कौतुक करताना दिसतात.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma)

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते आहेत. विराट-अनुष्काच्या रिसेप्शन पार्टीला पंतप्रधानांनी हजेरी लावली होती.

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)

पीएम मोदी आपल्या फिटनेसवर खूप लक्ष देतात.’फिट इंडिया मुव्हमेंट’ दरम्यान पीएम मोदींनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची भेट घेतली होती.

विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Ranjan Agnihotri)

या यादीत चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या नावाचाही समावेश आहे. विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आणि चित्रपट निर्मात्याचा गौरवही केला होता.

या व्यतिरिक्त रजनीकांत, प्रसून जोशी, अजय देवगण, परेश रावल, असे अनेक कलाकार पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे चाहते असून त्यांना फॉलो करतात.