पंतप्रधानांनी घेतला लसीकरणाचा पहिला डोस (PM Mod...

पंतप्रधानांनी घेतला लसीकरणाचा पहिला डोस (PM Modi Takes First Dose Of Covid-19 Vaccine)

आजपासून देशभरात लसीकरणाचा दुसरा डोस देण्याची मोहीम सुरु झाली. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी याची सुरुवात करून दिल्लीच्या एआयएमएमएस संस्थेत ही लस घेऊन चांगला संदेश दिला आहे. सदर वॅक्सिन बाबत काही लोकांनी शंका उपस्थित करून पंतप्रधान स्वतःला हि लस कां टोचून घेत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांना मोदीजींच्या या पुढाकाराने उत्तर मिळाले असणार . पंतप्रधानांनी ही लस घेऊन व्हिडीओ व ट्विटच्या माध्यमातून संदेश देत म्हटलं आहे की, ज्यांना योग्य आहे त्यांनी ही लस घ्यावी असा माझा आग्रह आहे. आपण सर्व मिळून भारताला कोविड -१९ पासून मुक्त्त करूया.