पंतप्रधान आणि बॉलिवूड कलाकारांनी दिल्या लतादीदी...
पंतप्रधान आणि बॉलिवूड कलाकारांनी दिल्या लतादीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा (PM Modi and Bollywood Stars Greets Lata Mangeshkar On Her Birthday)

आपल्या स्वर्गीय स्वरांनी कित्येक दशकांपासून अवघ्या जगाला आनंद देणाऱ्या लतादीदी मंगेशकर, यांना पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी व बॉलिवूडच्या कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून आपल्या शुभेच्छा प्रदान केल्या आहेत. ते म्हणतात – लतादीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांचा सुमधुर आवाज जगभरात गुंजतो आहे. भारतीय संस्कृतीबाबत त्यांना असलेल्या प्रेमाबाबत त्यांचा सन्मान केला जातो. लतादीदींना दीर्घायुष्य लाभो व त्यांची प्रकृती स्वस्थ राहो, ही माझी प्रार्थना.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बॉलिवूडचे हि-मॅन धर्मेन्द्र यांनी ट्विट करून लिहिलं – हॅपी बर्थ डे लताजी. जगभरातील सर्वाधिक आवडती लताजी. आपले छत्र सदैव आम्हा सगळ्यांवर राहू दे. आपण सदैव आनंदी राहा, निरोगी राहा.
जुही चावलाने लताबाईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १०० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. तसं लिहून ती पुढे म्हणते, ‘सकाळी रेडिओ ऐकत होते. त्यावरील आपली गाणी ऐकून असं वाटलं की फुलांचा वर्षाव होतो आहे. गंगेचा प्रवाह वाहतो आहे.’

मधुर भांडारकर यांनी शुभेच्छा देत म्हटलं की, श्री गजानन आपल्याला दीर्घ आणि स्वस्थ जीवन देईल.
फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम
भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीत ३६ भारतीय भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली आहेत. १९८९ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार तर १९९९ साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००१ साली आपल्या देशातील सर्वोत्तम – भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.