आजपासून सुरू होतोय पितृपक्ष… (Pitru Paksh...

आजपासून सुरू होतोय पितृपक्ष… (Pitru Paksha 2021)

हिंदू धर्मात पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा शतकानुशतके चालू आहे. विशेषतः पितृ पक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे श्राद्ध घालण्यात येते. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. पितृपक्षाच्या निमित्ताने दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. श्राद्धविधीत अन्य गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. हिंदू धर्मामध्ये पालकांची सेवा ही सर्वात मोठी पूजा मानली जाते. त्यामुळे हिंदू धर्मग्रंथांमध्ये पुत्राला पूर्वजांच्या मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक मानले गेले आहे. असे मानले जाते की जेव्हा तुमचे पूर्वज प्रसन्न होतात तेव्हा सर्व देव देखील प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात. पितृ पक्षाची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षाच्या पोर्णिमेच्या दिवसापासून होते आणि ती अश्विन अमावस्या तिथीला संपते. तर आपण जाणून घेऊ की २०२१ मध्ये पितृ पक्ष कधी सुरू होणार आहे. त्याची तारीख काय आहे आणि बरीच महत्वाची माहिती…

पितृपक्ष, Pitru Paksha 2021

कधी सुरू होणार पितृपक्ष?
यंदा २०२१ मध्ये पितृपक्ष २० सप्टेंबरपासून सुरु होत आहे. आणि ६ ऑक्टोबर, बुधवारपर्यंत चालू राहील. पितृपक्षातील श्राद्ध दरवर्षी अश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदेपासून सुरू होतात आणि अमावस्या तिथीपर्यंत संपतात. या संपूर्ण १५ दिवसांमध्ये, पूर्वजांना अन्न आणि पाणी देऊन त्यांना संतुष्ट करण्याची प्रथा आहे.

पितृपक्ष, Pitru Paksha 2021

पितृ पक्षातील श्राद्धाच्या तारखा
पौर्णिमा श्राद्ध – २० सप्टेंबर, सोमवार
प्रतिपदा श्राद्ध – २१ सप्टेंबर, मंगळवार
द्वितीया श्राद्ध – २२ सप्टेंबर, बुधवार
तृतीया श्राद्ध – २३ सप्टेंबर, गुरुवार
चतुर्थी श्राद्ध – २४ सप्टेंबर, शुक्रवार
पंचमी श्राद्ध – २५ सप्टेंबर, शनिवार
श्राद्ध तारीख क्र – २६ सप्टेंबर, रविवार
षष्टी श्राद्ध – २७ सप्टेंबर, सोमवार
सप्तमी श्राद्ध – २८ सप्टेंबर, मंगळवार
अष्टमी श्राद्ध – २९ सप्टेंबर, बुधवार
नवमी श्राद्ध – ३० सप्टेंबर, गुरुवार
दशमी श्राद्ध – 1 ऑक्टोबर, शुक्रवार
एकादशी श्राद्ध – 2 ऑक्टोबर, शनिवार
द्वादशी श्राद्ध – 3 ऑक्टोबर, रविवार
त्रयोदशी श्राद्ध – 4 ऑक्टोबर, सोमवार
चतुर्दशी श्राद्ध – 5 ऑक्टोबर, मंगळवार
अमावस्या श्राद्ध – 6 ऑक्टोबर, बुधवार